Breaking: प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष

पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांची मोठी घोषणा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्षांची घोषणा पवारांनी यावेळी केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे जाहीर केली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी बोलताना ही घोषणा केली आहे,

आगामी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी या दोघांवर असणार आहे. सध्या तरी अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गोवा आणि गुजरात या राज्यांची जबाबदारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत. तर दोघांकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर शरद पवार अध्यक्ष आणि सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष करावेत अशी चर्चाही पक्षात सुरू झाली होती. मात्र, या सर्व चर्चांना शरद पवारांनी आज वर्धापन दिनी पूर्णविराम दिला आहे. आज शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News