फास्टटॅग लावण्यासाठी आज शेवटचा दिवस; कॅशलेन बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) रविवारी रात्री 12 वाजेपासून सर्व टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता वाहनांना फक्त FASTag मधून टोल भरावा लागणार आहे. ज्यांच्याकडे FASTag नाही त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल. एनएचएआयने यापूर्वी 1 जानेवारीपासून  टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचा निर्णय दिला होता. नंतर ते दीड महिना वाढवण्यात आले. मात्र आता FASTag च्या अंमलबजावणी मुदतीला पुढे ढकललं जाणार नाही, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल स्पष्ट केलं.

Loading