creditcard

महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागात शुक्रवारी (दि. ३ सप्टेंबर) पाणीपुरवठा नाही

axis

महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागात शुक्रवारी (दि. ३ सप्टेंबर) पाणीपुरवठा नाही

No posts found.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील शुक्रवारच्या (दि. ३ सप्टेंबर) पाणीपुरवठ्याबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे.

पंचवटी विभागाअंतर्गत म्हसरुळ येथील एस्सार पंपाचे मागील बाजूच्या जलकुंभाजवळ पाणीपुरवठा करणारी वितरण वाहीनी जोडणीचे काम (cross connection) करणे आवश्यक आहे. सदरचे काम शुक्रवार दि.03 सप्टेंबर 2021 रोजी हाती घेण्यात येणार असल्याने एस्सार पंपाचे मागील बाजूच्या जलकुंभावरुन होणारा प्रभाग क्र.1 मधील दिंडोरी रोडच्या पुर्वेकडील भाग गजपंथ सोसायटी, रामचंद्रनगर, वडजे मळा, म्हाडा कॉलनी, कलानगर, प्रसादनगर, विजयनगर, पोकार कॉलनी, गायत्रीनगर, साईनगर, राजमाता म्ंगल कार्यालयापावेतो इत्यादी परिसरात शुक्रवार दि. 03/09/2021 रोजीचा दुपारचा 04:30 ते 06:30 वाजेचा पाणी पुरवठा होणार नाही त्याचप्रमाणे..

शनिवार दि.04 सप्टेंबर 2021 रोजीचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू
नाशिक: नळ कनेक्शन लावण्यावरून झालं भांडण; शेजाऱ्याने दगडच डोक्यात मारला..
नाशिक: विनाहेल्मेट पेट्रोल न दिल्याने पंप कर्मचाऱ्याला मा’र’हा’ण करणाऱ्यांना अनोखी शिक्षा