नाशिक: नळ कनेक्शन लावण्यावरून झालं भांडण; शेजाऱ्याने दगडच डोक्यात मारला..
नाशिक (प्रतिनिधी): नळ कनेक्शन लावण्यावरून दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण झालं आणि याचं पर्यावसन हा’णा’मा’री’त झालं. यात एका शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्याच्या थेट दगडच डोक्यात मारला.
याबाबत माणिक गजेराम कोल्हे (वय: ५०) यांनी दिलेली तक्रार आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. माणिक कोळे आणि संशयित श्याम थोरात हे एकमेकांचे शेजारी आहेत. त्यांच्या घराची भिंत एकमेकांना लागून आहे. थोरात यांनी भिंतीला लागुनच नळाच्या कनेक्शनचे काम सुरु केले. यावरून कोल्हे यांनी थोरात यांना विरोध केला. भिंतीला लागून मला भविष्यात काम करायचे आहे त्यामुळे भिंतीला लागून नळ कनेक्शन करू नका असे सांगितले. या गोष्टीचा थोरात यांना राग येऊन त्यांनी कोल्हे यांना शिवीगाळ केली, आणि जमिनीवर पडलेला दगड उचलून त्यांच्या कपाळावर मारला. यात कोल्हे जखमी झाले. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू
नाशिक: विनाहेल्मेट पेट्रोल न दिल्याने पंप कर्मचाऱ्याला मा’र’हा’ण करणाऱ्यांना अनोखी शिक्षा