…तर इंधनाच खर्च निम्म्यावर येईल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा

…तर इंधनाच खर्च निम्म्यावर येईल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा

इंधनाच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत.

यामुळे अनेकांचं बजेड कोलमडलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा मुकाबला करण्यासाठी देशाला पर्यायी इंधन स्त्रोतांचा  वापर करावा लागेल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी  यांचे म्हणणे आहे.

तसेच मालवाहतूक जलमार्गांना  चालना द्यावी लागेल कारण ते वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन आहे.

मंगळवारी ‘वॉटरवेज कॉन्क्लेव्ह-2022’ला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांचे स्वस्त आणि सहज उपलब्ध पर्याय शोधणे आता गरजेचे झाले आहे. डिझेलला मिथेनॉल हा पर्याय असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, ते डिझेलपेक्षाही स्वस्त आहे आणि डिझेल इंजिनला मिथेनॉलवर चालणाऱ्या इंजिनमध्ये रूपांतरित करण्याचे तंत्रज्ञानही उपलब्ध आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, आसाममध्ये दररोज 100 टन मिथेनॉलचे उत्पादन होते. हे उत्पादन दररोज 500 टनांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तंत्रज्ञानात बदल करून डिझेल इंजिनचे रूपांतर मिथेनॉल इंजिनमध्ये केले तर त्याचा फायदा आसामला होईल. ते म्हणाले की, मिथेनॉलच्या वापरामुळे इंधनाचा खर्च 50 टक्क्यांनी कमी होईल. आम्ही मिथेनॉलवर चालणारी सागरी इंजिने विकसित करू शकतो आणि डिझेल इंजिन त्यात बदललं जाऊ शकतं. डिझेल इंजिनांना मिथेनॉल इंजिनमध्ये रूपांतरित करण्याचे तंत्रज्ञान स्वीडिश कंपनीकडे आहे, असं गडकरी यांनी सांगितलं.

जलमार्गांचा अधिक वापर:
नितीन गडकरी म्हणाले की, मालवाहतुकीसाठी जलमार्गांचा अधिक वापर केला पाहिजे. रस्त्याने वाहतुकीचा खर्च 10 रुपये असेल तर तो रेल्वेमार्गे 6 रुपये आहे. दुसरीकडे, जलमार्ग वापरल्यास हा खर्च केवळ 1 रुपयापर्यंत खाली येतो. सध्या वाहतूक खर्च खूप जास्त आहे. ते कमी करणे आवश्यक आहे. जलमार्गाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देताना ते म्हणाले की, यामुळे व्यापार वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. नितीन गडकरी यांनी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना मिथेनॉलच्या वापराचा विचार करून जलमार्गातून अधिक मालवाहतूक करण्याचा पर्याय पाहण्याची सूचना केली.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News