कोरोना व्हायरस मानवी त्वचेवर किती वेळ जिवंत राहतो? संशोधनात अंचबित करणारी माहिती समोर

संशोधकांनी इन्फ्लुएंजा व्हायरस आणि नोव्हल कोरोना व्हायरसचा तुलनात्मक अभ्यास केला असून त्यामधील माहिती जगासमोर मांडली आहे.

नवी दिल्ली: कोरोना व्हायरस मानवी त्वचेवर तब्बल नऊ तास जिंवत राहू शकतो, अशी माहिती एका अभ्यासात समोर आली आहे. संशोधकांनी इन्फ्लुएंजा व्हायरस आणि नोव्हल कोरोना व्हायरसचा तुलनात्मक अभ्यास केला असून त्यामधील माहिती जगासमोर मांडली आहे. अभ्यासात म्हटले आहे की मानवी त्वचेवर इन्फ्लुएंजा व्हायरस (आयव्ही) दोन तास जिंवत राहू शकतो. तर कोरोना व्हायरस (Covid-19) मानवी त्वचेवर तब्बल नऊ तास जिंत राहू शकतो.

कोरोना व्हायरस मानवी त्वचेवर किती वेळ जिवंत राहतो? याबाबतचं संशोधन क्लिनिकल इन्फेक्शस डिसीजने प्रकाशित केलं आहे. अभ्यासात म्हटले आहे की, दोन्ही व्हायरस हॅण्ड सॅनिटायझरने निष्क्रिय होतात. सतत हॅण्ड सॅनिटायझरने हात स्वच्छ करायला हवेत, ही बाब क्लिनिकल इन्फेक्शस डिसीजने प्रकाशित केलेल्या अभ्यासावरुन पुन्हा एकदा अधोरेखित होते. सदर संशोधनात प्रामुख्याने जपानच्या क्योटो येथील प्रिफेक्चरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनमधील संशोधक सहभागी झाले होते. हात स्वच्छ राखणे हा कोरोनाला रोखण्यासाठीचा मुख्य उपाय असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.

Loading