कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत टास्क फोर्सने दिली महत्त्वाची माहिती

चीनमध्ये वेगाने फैलावत असलेल्या कोरोनाच्या बीएफ.7 वेरिएंटने (Coronavirus BF.7 variant) जगाची चिंता वाढवली आहे. मात्र, कोरोनाच्या या व्हेरियंटमुळे फारशी चिंता करण्याचे कारण नसल्याचे  राज्याचे आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी आणि कोरोना टास्क फोर्सचे (Coronavirus Task Force) सदस्य डॉ. प्रदीप आवटे यांनी म्हटले.

भारतात बीएफ.7 नव्या वेरियंटचेचे रुग्ण गुजरातमध्ये जुलै आणि ऑक्टोबर महिन्यातच सापडले होते. जर हा वेरिएंट अधिक संसर्गजन्य असता, तर आजवर गुजरात (Gujarat) आणि संपूर्ण देशात कोरोनाचे रुग्ण दिसून आले असते. मात्र तसे झाले नसल्याचेही त्यांनी म्हटले.

डॉ. प्रदीप आवटे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात गेल्या एक महिन्यात कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत. मागील आठवड्यात राज्यातील कोरोनाबाधितांची प्रकरणे 30 टक्क्यानी कमी झाली आहेत. गेल्या आठवड्यात फक्त 16 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले, असल्याची माहिती त्यांनी दिली.

चीन, जपान, अमेरिका आणि इतर काही देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. चीनमध्ये बीएफ.7 मुळे संक्रमण वाढत आहे. मात्र हा काही नवीन व्हेरियंट नाही. हा ओमायक्रॉनचा प्रकार असल्याचे डॉ. आवटे यांनी सांगितले.

बीएफ.7 गुजरात मध्ये जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात आढळला होता. मात्र, त्याचा फैलाव झाला नाही. त्यामुळे चीनमध्ये धुमाकूळ घालणारा बीएफ.7 हा व्हेरियंट भारतातही धुमाकूळ घालेल  याची शक्यता कमी आहे. या व्हेरिएंटमुळे नवीन लाट निर्माण होईल अशी शक्यता कमी असल्याचे त्यांनी म्हटले.

जिनोम सिक्वेन्सिंग करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जेव्हा संक्रमण कमी असतो तेव्हा शंभर टक्के लोकांचा जीनोम सिकवेंसिंग करणं आवश्यक आहे आणि आपण तसंच करत असल्याचे नव्या व्हेरियंटबद्दल लगेच कळावे म्हणून हे करत असल्याचे त्यांनी सांगितले.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News