आता YouTube व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही ‘ही’ गोष्ट: झाला सर्वात मोठा बदल

You tube हा एक प्रभावी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. युझर्स यू-ट्यूबच्या माध्यमातून माहितीपर, मनोरंजक व्हिडिओ शेअर करू शकतात.

तसंच स्वतःचं चॅनेलही सुरू करू शकतात. सध्याच्या काळात यू-ट्यूब हे कमाईचं एक साधन बनलं आहे; मात्र डिसलाइक या ऑप्शनच्या माध्यमातून लहान किंवा नवोदित क्रिएटर्सना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचं यू-ट्यूब कंपनीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, आता यू-ट्यूबवर डिस्लाइकचे आकडे दिसू शकणार नाहीत. याबाबत यू-ट्यूबनं अधिकृत घोषणा केली आहे.

लहान क्रिएटर्सच्या व्हिडिओजवर डिस्लाइकचे आकडे वाढवले जातात. तसंच त्यांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जातं. त्यामुळे या निर्णयाचा फायदा लहान क्रिएटर्सना अधिक होईल, असा विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे. आम्ही प्रेक्षक आणि क्रिटएर्स यांच्यातल्या आदरपूर्ण परस्परसंवादाला प्रोत्साहन देत आहोत, असं यू-ट्यूबनं स्पष्ट केलं आहे.

यापुढेही डिस्लाइकचं बटण दिसणार असून, डिसलाइक करताही येणार आहे. परंतु, अन्य कोणत्याही व्यक्तीला व्हिडिओ किती जणांनी डिस्लाइक केला आहे, हे दिसू शकणार नाही. व्हिडिओ तयार करून अपलोड करणाऱ्या व्यक्तीला मात्र तो किती जणांनी नापसंत म्हणजेच डिसलाइक केला आहे हे दिसू शकेल. यामुळे पब्लिक शेमिंगसारखे (Public Shaming) प्रकार रोखण्यास मदत होणार असल्याचं यू-ट्यूबनं स्पष्ट केलं आहे. कंपनीनं या निर्णयाची घोषणा त्यांच्या एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

प्रयोगानंतर कंपनीनं घेतला निर्णय:
यू-ट्यूबनं एका प्रयोगानंतर यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. एखाद्या व्हिडिओला किती डिस्लाइक मिळाले आहेत, हे अन्य लोकांना पाहता येत नसल्यामुळे ते जाणीवपूर्वक डिस्लाइक करणार नाहीत. परिणामी छोट्या क्रिएटर्सवर होणारे हल्ले कमी झाले असल्याचं कंपनीच्या निदर्शनास आलं आहे.

यापूर्वी कंपनीनं अजून एक प्रयोग केला होता. छोट्या क्रिएटर्सनी नव्यानं चॅनेल सुरू केल्यानंतर, त्यांना विनाकारण लक्ष्य केलं जात असल्याचं या प्रयोगात दिसून आलं होतं. लहान चॅनेल्सवर जाणूनबुजून हे हल्ले केले जात असल्याचं यू-ट्यूबनं त्यांच्या डाटाच्या आधारे स्पष्टदेखील केलं होतं. हे पाहता कंपनीनं आपलं डिस्लाइक अकाउंट प्रायव्हेट केलं आहे. याचा अर्थ असा, की आता फक्त क्रिएटर्सच त्यांच्या डिसलाइक अकाउंटचा तपशील पाहू शकणार आहेत. तथापि, डिसलाइक बटण जसं आहे तसंच राहील. क्रिएटर स्टुडिओमध्ये जाऊन क्रिएटर्स आपल्याला मिळालेले डिस्लाइक्स पाहू शकणार आहेत.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News