कोरोनाव्हायरसनंतर राज्यात Zika virus चं संकट; काय आहेत याची लक्षणं?

कोरोनाव्हायरसनंतर राज्यात Zika virus चं संकट; काय आहेत याची लक्षणं?

केरळपाठोपाठ महाराष्ट्रातही झिका व्हायरसने (Zika virus) शिरकाव केला आहे. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या पुण्यात झिका व्हायरसची (Zika virus in Pune) लागण झालेला पहिला रुग्ण आढळला आहे.

कोरोनाची (corona) लाट ओसरत नाही तेच महाराष्ट्रात आता झिका व्हायरसचं संकट आलं आहे.  पुण्यात (pune) झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुरंदर तालुक्यातील  बेलसर (belasar) येथे झिका व्हायरसची लागण झालेला एक रुग्ण आढळून आला. हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. हेच डास डेंग्यूही पसरवतात. साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रजनन होतं आणि हे डास घरात राहण्याचं प्रमाण अधिक असतं.

झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल 1947 मध्ये युगांडातल्या झिका जंगलांत राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांत आढळला. त्यानंतर 1952 साली हा व्हायरस माणसांच्या शरीरात आला. 1950पर्यंत तो केवळ आफ्रिका, आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता. 2007 ते 2016 या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला,. 2015-16मध्ये अमेरिकेने त्याला महासाथ घोषित केलं होतं.

ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, शरीरावर चट्टे, डोळे येणे, अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात. झिका विषाणूमुळे जन्मजात दोष उद्भवतात. गिलेन बॅरे सिंड्रोमही होऊ शकतो. गर्भवती महिलांना संसर्ग झाल्यास तिच्या बाळामध्ये व्यंगही येऊ शकतं. झिका विषाणूवर अद्याप औषध नाही; मात्र इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन (Inactivated Vaccine) विकसित करण्याचे आदेश जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिले आहेत.

मार्च 2016 पासून जगभरातल्या 18 औषध कंपन्या या लसनिर्मितीचं संशोधन करत आहेत. यासाठी 10 वर्षं लागू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. काही लशींच्या चाचण्या झाल्या असल्या, तरी अद्याप कोणत्याच लशीला मंजुरी नाही आणि उत्पादनही सुरू झालेलं नाही. त्यामुळे हा संसर्ग अधिक धोकादायक आहे.

नाशिक शहरातल्या या महत्वाच्या बातम्या तुम्ही वाचल्या का ?
इगतपुरीच्या व्हिंटेज व्हॅली येथे महिलेवर अत्याचार; एकास पोलिस कोठडी
महत्वाची बातमी: नाशिक शहरात ‘या’ तारखेपासून नो हेल्मेट, नो पेट्रोल ! पंपांवर सीसीटिव्ही !
नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १ ऑगस्ट २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
Amazon देतंय किराणा मालावर घसघशीत सुट.. ऑफर फक्त आजच्यासाठीच मर्यादित..

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.