पुणे: रविवारपर्यंत तीन शाळांना सुट्टी- खबरदारीचा उपाय

पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 झाल्याने अधिक सजग राहण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. एका बाजूला पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापना कायदा लागू (Disaster Management Act ) केला असून पुण्यातील तीन शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुण्यात कोरोना बाधित 5 रुग्ण आढळून आल्याने भीती व्यक्त केली जात आहे. झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनापासून खबरदारी म्हणून पुण्यातील तीन शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कात्रज, धायरी, नांदेड सिटीमधील तीन शाळांना रविवारपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.

खबरदारी म्हणून पुण्यात तीन शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. रविवारपर्यंत या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कात्रज, धायरी, नांदेड सिटीमधील (प्रत्येकी) तीन शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. संक्रमण थांबवणे हा मुख्य हेतू असून यामध्ये वैयक्तिक काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. संक्रमण थांबविण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Loading