पुण्यात २३ जुलैनंतर लॉकडाउन नसेल; जिल्हाधिकारी नवलकिशोर राम

पुणे; करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची साखळी तोडता यावी म्हणून पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आलाय. आज (सोमवार) लॉकडाउनचा सातवा दिवस आहे. मात्र यानंतर, २३ जुलैपासून पुणे जिल्ह्यात लॉकडाउन नसेल, अशी सूचक माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे.

सोमवारी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले, करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या काळात नागरिकांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले. त्यामुळे या लॉकडाउननंतर पुन्हा लॉकडाउन असणार नाही. मात्र, या पुढील काळात देखील आजपर्यंत शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे.