Share Market Opening Bell :शेअर बाजाराची सपाट सुरुवात, बाजारात अस्थिरता राहण्याचे संकेत

शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशीची सुरुवात सपाट झाली. सुरुवातीला 93 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स (Sensex) खुला झाला. तर, निफ्टी (Nifty) किंचीत वधारत खुला झाला. बाजार आज अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. आयटी, मेटल, फार्माच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 93.48 अंकांच्या घसरणीसह 58,747 अंकांवर खुला झाला. तर, एनएसई निफ्टी 9.80 अंकांच्या तेजीसह  17,540 अंकांवर खुला झाला. निफ्टी मिडकॅप इंडेक्स 0.50 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 0.54 टक्क्यांच्या तेजीसह 58,841.33 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 10 अंकांच्या तेजीसह 17,541.10 अंकांवर व्यवहार करत आहे. 

बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्समधील 30 पैकी 24 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. तर, सहा कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. निफ्टी 50 पैकी 36  कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.  सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, इन्फोसिस, एसबीआय, इंडसइंड बँक आणि अॅक्सिस बँकेत तेजी दिसून येत आहे.

बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्समधील 30 पैकी 24 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. तर, सहा कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. निफ्टी 50 पैकी 36  कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, इन्फोसिस, एसबीआय, इंडसइंड बँक आणि अॅक्सिस बँकेत तेजी दिसून येत आहे.

पॉवरग्रीड, आयटीसी, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, टीसीएस, एनटीपीसी, नेस्ले, एचयूएल, भारती एअरटेल, एल अॅण्ड टी, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, कोटक बँक, टाटा स्टील, सन फार्मा आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे.

शुक्रवारी बाजारात घसरण:
आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी निराशाजनक राहिला. जागतिक घडामोडी आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीमुळे बाजारात मोठी घसरण झाली. शुक्रवारी झालेल्या घसरणीनंतर सेन्सेक्स 59000 अंकांखाली आहे. बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 1093 अंकांच्या घसरणीसह 58,840 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत (Nifty) 345 अंकांची घसरण झाली. निफ्टी 17530 अंकांवर बंद झाला.

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.