Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये विद्यार्थिनींना मारहाण, धक्कादायक VIDEO समोर

वृत्तसंस्था: युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध पेटले आहे.

अजूनही शेकडो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहे.

विद्यार्थ्यांना परत आणण्याची मोहीम सुरू आहे.

पण अशातच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. कीवच्या बॉर्डरवर तरुणींना मारहाण झाल्याचे समोर आले आहे. आपले भारताचे सरकार काहीच करत नाही, असा आरोपच एका भारतीय तरुणीने केला आहे.

युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी अडकून पडलेले आहेत. रोमानिया सीमा भागामध्ये तरुणींनी मारहाण केली जात आहे अशा प्रकारची तक्रार कीवमधील असलेल्या तरुणींनी केलेली आहे. सीमेवर या विद्यार्थ्यांना अडवण्यात आले आहे. तेथील जवान त्यांना हाकलून देत आहे. एवढंच नाहीतर हवेत गोळीबार करून हाकलून देण्याचा प्रकारही घडला आहे. त्यामुळे विद्यार्थी भयभीत झाले आहे.

एका भारतीय तरुणीने भयभीत होऊन एक व्हिडीओ पाठवला आहे. भारत सरकार आमच्यासाठी काहीच करत नाही, आम्ही ज्या ठिकाणी आहोत तिथून 8 हजार किलोमीटर दूर बॉर्डर आहे. आणि भारतीय राजदूताच्या कार्यालयात फोन केला. पण तिथले अधिकारी फोन देखील उचलत नाही, अशी तक्रार केली आहे. तसंच, ‘भारत सरकारने तातडीने काही तरी करावे आणि आम्हाला सुरक्षीत ठिकाणी सोडावे अशी विनंती या तरुणीने केली आहे.

हाडं गोठवणाऱ्या थंडीत विद्यार्थ्यांची पायपीट!:
दरम्यान, रशिया- युक्रेन युद्धामुळे सुमारे 16 हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. ज्यात बहुतांश विद्यार्थी आहेत. युक्रेनमध्ये अडकले आहेत. तेथे अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारतानं शनिवारी ऑपरेशन सुरू केलं. AI 1944 च्या पहिल्या विमानानं 219 लोकांना बुखारेस्टहून मुंबईत (Mumbai) आणलं. युक्रेनमध्ये अडकलेल्या 250 भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे दुसरे विमान रविवारी पहाटे रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) पोहोचलं. दरम्यान, ऑपरेशन गंगा अंतर्गत तिसरे विमान बुडापेस्ट (हंगेरी) येथून 240 भारतीय नागरिकांना घेऊन दिल्लीला रवाना झालं आहे.

युक्रेनच्या पोलंड आणि हंगेरीच्या सीमेवर शेकडो भारतीय अजूनही अडकले आहेत. एका भारतीय विद्यार्थ्यानं सांगितलं की, ‘येथील तापमान -7 अंशांच्या जवळ आहे. मी काय करावं हे मला कळत नाही. अहवालानुसार युक्रेनमधील अनेक भारतीयांना युद्धादरम्यान शेल्टर, अन्न आणि पैशाची सुविधा नाही. त्यांचे मोबाईलही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

रिपोर्टनुसार, युक्रेनचे गार्ड्स भारतीयांना चेक पॉईंट पार करु देत नाहीत. सीमा ओलांडण्यासाठी गार्ड्सकडून विद्यार्थ्यांकडून लाच मागितल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. शुभम नावाच्या विद्यार्थ्यानं सांगितलं की, आम्ही सीमेवर अडकलो आहोत. आम्हाला येथे व्हिडिओ बनवण्यास मनाई आहे. आणखी एका विद्यार्थ्यानं सांगितलं की, दूतावासाने जारी केलेल्या सल्ल्यानुसार आम्ही सर्वजण पोलंडच्या सीमेवर पोहोचलो आहोत. इथे आम्हाला थांबवलं आहे. आता आम्ही काय करू? असा सवाल या विद्यार्थ्याने केला आहे.

Loading