पुणे लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु: पेट्रोल विक्रीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढला नवा आदेश

पुणे : कोरोनाचा वाढता प्राधुर्भाव आणि साखळी तोडण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाऊन केले आहे त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. मात्र लॉकडाऊनचा आदेश काढताना पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्या चुकीचा जिल्हाधिकाऱ्यांना खुलासा करावा लागला आहे. पेट्रोल विक्रीसाठी आयुक्तांच्या आदेशात फक्त अत्यावश्यक सेवेचा उल्लेख करण्यात आला आहे, तसेच कामगारांनाही पेट्रोल विक्री करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.

उद्योग, आस्थापनांनी त्यांच्या कामगार, कर्मचाऱ्यांना दिलेले पासेस पुणे महापालिका, पिंपरी- चिंचवड महापालिका तसेच पुणे ग्रामीण क्षेत्रात येण्या-जाण्यास पात्र राहतील, असे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी कळविले आहे.

पुणे जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर झाली असून या कालावधीत उद्योग, आस्थापना, कंपन्यांनी त्यांच्या कामगार, कर्मचाऱ्यांना दिलेले पास पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण क्षेत्रात प्रवासासाठी लागू रहातील, असे स्पष्ट करण्यात आलं आहे.

सर्व औद्योगिक आस्थापना, आयटी कंपन्या, दूरसंचार कंपन्या आणि कृषी कंपन्या कडक टाळेबंदीच्या (लॉकडाऊन) काळातदेखील सुरू राहणार आहेत. या कंपन्यांमधील अधिकारी, कामगार यांना रोजच्या प्रवासासाठी पोलीस पासची गरज नसेल, असं विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी कळवलं आहे.

कंपन्यांच्या एचआर (मनुष्यबळ) विभागप्रमुखाने कंपनीच्या लेटरहेडवर वाहन परवाना द्यावा. या परवान्यांची माहिती एचआरने संबंधित पोलीस आयुक्त व पोलीस स्टेशन प्रभारी यांना द्यावी. कामगार-अधिकाऱ्यांनी कंपनीने दिलेला वाहन परवाना सोबत ठेवणे बंधनकारक आहे. मेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व्यावसायिक, आणि रुग्णवाहिकांना शहरांतर्गत वाहतुकीसाठी वेगळ्या पासची अथवा परवानगीची गरज नाही. तसंच पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी ९ ते ६ वेळेत शासकीय, अत्यावश्यक सेवेतील तसेच कंपन्यांनी परवानगी दिलेल्या वाहनांसाठी सुरू राहतील, असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळवलं आहे.

MIDC क्षेत्र सुरू राहणार

मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा सुरु झालेल्या एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार आहेत. परंतु जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कटेन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले,चाकण, तळेगाव, रांजणगाव, बारामती, जेजुरी, कुरकुंभसह जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्र सुरु राहतील, ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या सर्व ग्रामपंचायती,तालुक्याच्या ठिकाणची शेती संबंधित खते, औषधे व अवजारांच्या दुकानांवर कोणत्याही प्रकारची निर्बंध घालण्यात आलेले नाहीत.

ग्रामीण भागात नागरिकांनी कामाशिवाय बाहेर फिरु नये, असेही जिल्हाधिकारी राम यांनी आवाहन केले आहे.

Loading