पुणे: दहावीच्या मुलाने मोबाईल गेमच्या नादात संपवलं जीवन; स्वत:च्या हत्येचा कागदावर आखला प्लॅन

पुणे (प्रतिनिधी): माणसं सोशल मीडियाच्या अधीन झाली आहेत, तर लहान मुलं मोबाईलच्या नादी लागली आहेत, अशीच सध्याची परस्थिती आहे. त्यामुळे, लहान मुलांचं मोबाईल वेड कसं कमी करावा हा पालकांसमोर यक्षप्रश्न आहे.

कारण, मुलांना लागलेलं हे मोबाइलचं वेड कधी व्यसन बनतं, त्यातूनच ते टोकाचं पाऊल उचलतात. यापूर्वी मोबाईल व्यसनाधिनता आणि मोबाईल गेमिंगच्या नादातून अशा घटना घडल्या आहेत. आता, पिंपरी चिंचवडमधील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलाला गेमचं व्यसन जडलं. या व्यसनाच्या आहारी तो इतका गेला की, याचा शेवट आत्महत्येनं झाला. या 15 वर्षीय मुलाने थेट चौदाव्या मजल्यावरून उडी घेतल्याचं समोर आलं आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड भागात घडली आहे. मुलगा सहा महिन्यांपासून ब्लू व्हेल खेळत असावा असा अंदाज आहे.

26 जुलै रोजी रात्री मुलाने घराच्या इमारतीवरुन उडी घेत आपलं जीवन संपवलं. या घटनेनं परिसर हादरुन गेला आहे.  गेल्या सहा महिन्यांपासून हा मुलगा गेमच्या आहारी गेला होता. त्यानंतर तो स्वतःला बेडरूममध्ये तीन-तीन तास कोंडून घेत असे. खोलीत एकटाच बडबड करत असायचा. घरात आजवर वडिलधाऱ्यांना घाबरणारा मुलगा थेट किचनमधील चाकूची मागणी करायला लागला होता.

हा बदल पाहून आई-वडीलही चिंतेत होते. अतिवृष्टीमुळं 25 जुलैला शाळांना सुट्टी होती, तो ही दिवस त्याने गेम खेळण्यातचं घालवला. मग रात्री अनेक विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर पडला. मात्र, जेवण केल्यावर पुन्हा तो खोलीतचं जाऊन बसला. त्याचवेळी सोसायटीच्या व्हाट्सएपवर एक मुल जखमी अवस्थेत खाली पडल्याचा मेसेज आला. तो मेसेज मुलाच्या आईने वाचला अन तिला थोडी कुणकुण लागली. मग ती खोलीच्या दिशेने गेली, पण मुलगा घरात नव्हता, त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ पोहचली, बघते तर काय? तो तीचाचं मुलगा होता.

सदर मुलगा 14 व्या मजल्यावर राहत होता. त्याच्या घराच्या बाल्कनीला कबुतरांसाठीची नायलॅानची जाळी लावलेली आहे. ती जाळी कशी कापायची आणि खाली उडी कशी मारायची याचे स्केच मुलाने उडी मारण्यापूर्वी तयार केले होते. काही वर्षांपूर्वी ब्लू व्हेल गेम खूप चर्चेत आला होता. या गेमचा शेवटचा टप्पा म्हणजे स्वतःला संपवणं. अशातच हा गेम खेळत असताना प्रत्येक टप्पा पार करीत 15 वर्षांच्या मुलाने शेवटच्या टप्प्यात स्वतःला संपवलं अन् बाल्कनीतून उडी मारली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटच्या लेकाला पाहून, आईची पायाखालची जमीनचं सरकली. मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घरात एका कागदावर गेममधील कोडिंगच्या भाषेत लिहिलेलं काहीतरी आढळलं. मात्र यातून त्याला काय नमूद करायचं होतं, याचा शोध आता पिंपरी चिंचवड पोलीस लावत आहेत.

मात्र, असंख्य गेमच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी आणि त्याकडे कानाडोळा करणाऱ्या पालकांसाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. या घटनेतून ते धडा घेतील आणि अशा धक्कादायक घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. याची ते आत्ताच तातडीनं खबरदारी घेतील, अशी अपेक्षा सुजाण व पोलिसांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या पुण्यातील घटनेनं लहान मुलांमधील मोबाईल व गेमिंगचं व्यसन ही चिंतेची बाब बनली असून पालक व शिक्षकांनीच यातून मार्ग काढला पाहिजे, असेही मत व्यक्त होत आहे.

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.