नाशिकच्या कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट: शहर: ९७.०४ टक्के तर ग्रामीण: ९५.३५ टक्के

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ७०  हजार ६५६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १० हजार १३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ३६२ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ६६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ७०८,  बागलाण ३२२, चांदवड ४४८, देवळा १७६, दिंडोरी ४५९, इगतपुरी ८६, कळवण ३०६, मालेगाव २९९, नांदगाव २७३, निफाड ४८१, पेठ ४३, सिन्नर ६२६ , सुरगाणा ९३, त्र्यंबकेश्वर ३६, येवला १०२ असे एकूण ४ हजार ४५८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार ६१७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ९९३ तर जिल्ह्याबाहेरील ६५ रुग्ण असून असे एकूण १० हजार १३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८५  हजार ४५४ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९५.३५ टक्के, नाशिक शहरात ९७.०४ टक्के, मालेगाव मध्ये  ८९.४४  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.८७  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.१६  इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण २ हजार २६८ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ९८७  मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३१२ व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार ६६६  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

(वरील आकडेवारी दि. ३१ मे २०२१ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading