नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ६४ हजार ४१९ रुग्ण कोरोनामुक्त !

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ६४ हजार ४१९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १३ हजार ९७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ४२५ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ५५०  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार १८२,  बागलाण ५९६, चांदवड ५८१, देवळा ५१५, दिंडोरी ६५४, इगतपुरी १३४, कळवण ५२७, मालेगाव ५१९, नांदगाव ४३६, निफाड ९२६, पेठ ४७, सिन्नर ६८१, सुरगाणा १३५, त्र्यंबकेश्वर ६५, येवला १०८ असे एकूण ७ हजार १०६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५ हजार ८७९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ९८७ तर जिल्ह्याबाहेरील एकही रुग्ण नसून असे एकूण १३ हजार ९७२  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ३ लाख  ८२  हजार ९४१ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९३.५१  टक्के, नाशिक शहरात ९६.४८ टक्के, मालेगाव मध्ये  ८९.५१  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.१६  इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण २ हजार २०१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ९४७ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३०३  व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार ५५०  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

(वरील आकडेवारी दि. २८ मे २०२१ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

boat

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.