निम्मा ‘महाराष्ट्र’ राज ठाकरेंच्या बाजूने, मनसेच्या सर्व्हेत लॉकडाउनबद्दल लोकं म्हणतात…

मनसेनं कोरानामुळे असलेल्या लॉकडाउन संदर्भात एक सर्व्हे केला होता. आता त्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्रात कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून लॉकडाउन कायम आहे. लॉकडाउन लागू असल्यामुळे सर्वच क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाउन हटवावा अशी मागणी होत आहे. त्यामुळे मनसेनं एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत 70.3 टक्के लोकांनी लॉकडाउन हटवावा असं मत नोंदवलं आहे.

मनसेनं कोरानामुळे असलेल्या लॉकडाउन संदर्भात एक सर्व्हे केला होता. आता त्याची माहिती समोर आली आहे. यात लॉकडाउन आता संपवला पाहिजे, असं 70.3 टक्के जणांनी म्हटलं आहे. तर तब्बल 89.3 टक्के जणांनी लॉकडाउनचा नोकरीवर विपरित परिणाम झाल्याचं म्हटलं आहे. तर लॉकडाउनच्या काळात नोकऱ्या आणि उद्योगधंद्यांसाठी सरकारकडून योग्य मदत मिळाली नसल्याचं 84.9 टक्के जणांनी सांगितलं आहे. तर राज्य सरकारने शिक्षणाबद्दल घेतलेला निर्णय योग्य नसल्याचं 52.4 टक्के जणांनी म्हटलं आहे.

शालेय शुल्काबाबत सरकारी धोरणांची अंमलबजावणी होत नसल्याचं 74.3 टक्के जणांनी आपलं मत नोंदवलं आहे. तर मुंबईकरांच्या दृष्टीने जिव्हाळ्याची असलेली लोकलसेवा पूर्ववत व्हावी असं 73.5 टक्के जणांनी म्हटले आहे.

लॉकडाउनच्या काळात मदत वेळेत आणि योग्य मिळाली नसल्याचं 60.2 टक्के जणांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर या काळात वीज बिलांबद्दल समाधानी नसल्याचं तब्बल 90.2 टक्के जण म्हणाले आहेत. लॉकडाउनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरी थांबूनच काम करत होते, याबद्दल 63.6 टक्के जणांनी नाराजी व्यक्त केली आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News