अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर

मुंबई : विधीमंडळाच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली. 68 गावांमधील 15 हजार शेतकऱ्यांची ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज जाहीर झालेल्या यादीत 68 गावातील 15 हजार 368 लोकांची नावं आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांचा समावेश आहे. यात 4500 जणांना आधार प्रमाणपत्र दिलं. 24 तासात त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. तसेच आतापर्यंत 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती रजिस्टर झाली आहे. अद्याप 1 लाख 61 हजार खात्यांची माहिती येणे बाकी आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी यादी जाहीर झाल्यानंतर त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे.

Loading