creditcard

मनसुख हिरेन केसचा गुंता सुटला.. शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट !

axis

गेल्या अनेक दिवसांपासून रात्रंदिवस एक करून याप्रकरणी न्याय्य पद्धतीने काम केलेल्या माझ्या एटीएस पोलिस दलाच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून अभिवादन करतो, असेही त्यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हंटले आहे.

No posts found.

मुंबई (प्रतिनिधी): एकीकडे राज्यात सचिन वाझेंना  महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग  यांनी केल्याने खळबळ उडालेली असताना दुसरीकडे मनसुख हिरेन प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.  मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलीस विनायक शिंदे (५१) आणि बुकी असलेला नरेश गोर (३१) याला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. त्यानंतर राज्याच्या एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट करून अत्यंत संवेदनशील मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील गुंता सुटला असल्याची माहिती दिली आहे. 

तसेच शिवदीप लांडे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रात्रंदिवस एक करून याप्रकरणी न्याय्य पद्धतीने काम केलेल्या माझ्या एटीएस पोलिस दलाच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून अभिवादन करतो. माझ्या पोलिस कारकीर्दीची आजपर्यंतची ही सर्वात जटिल घटना होती. असे नमूद केले आहे. सचिन वाझे यांचा ताबा एटीएसला हवा आहे. त्यासाठी सचिन वाझे यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातही हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यातच वाझे यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे ठोस पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. सचिन वाझेंचा प्रथम दर्शनी ह त्या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा करण्यात येत आहे. एटीएसचे अधिकारी शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु असून अनेक जबाब देखील घेण्यात आले आहेत. कोर्टात एटीएसने तब्बल ४ पानांचा अहवाल दिला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. NIA कोर्टातून सचिन वाझे यांचा ताबा मिळावा या करता एटीएसने ठाणे कोर्टातून परवानगी देखील मिळवली आहे