नवी दिल्ली (वृत्तसंस्था): कोविद १९, म्हणजेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा शाळा महाविद्यालयं सुरु करण्याच्या दिशेनं केंद्र आणि राज्य सरकार पाऊल उचलत आहे. केंद्र सरकारनं (NCRT) पालन आणि शिक्षकांनी काय गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या गोष्टींचं पालन करायला हवं या संदर्भात काही गाइडलाइन्स जारी केल्या असल्याचे समजते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून गाड्यांसारखाच आता वर्गात आणि विद्यार्थ्यांसाठी सम-विषमचा फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो असं सांगितलं जातंय. दैनिक भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार शाळा उघडल्यानंतर सम-विषम रोलनंबरच्या आधारे करण्यात येईल. दोन शिफ्टमध्ये शाळा सुरू करण्यात येईल. शाळेत पोहोचण्यासाठी वर्गानुसार 10-10 मिनिटांच्या अंतरानं विद्यार्थ्यांना वेळा ठरवून दिल्या जातील त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल. तर बंद खोलीत तास घेण्याऐवजी मोकळ्या जागेत किंवा मोकळ्या वर्गात शिकवण्याची शिफरसही करण्यात आल्याचं या गाइडलाइन्समध्ये शिफारस करण्यात आली आहे.