गुगलचं वर्चस्व संपणार? गुगलला टक्कर द्यायला आलंय OpenAIचं SearchGPT !

आपल्या सर्वांच्या आवडीचे सर्च इंजिन म्हणजे गुगल. पण आता भारतातच नाही तर जगभरात गुगलला टक्कर देणारा एक नवीन शोध इंजिन आला आहे. OpenAI या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने ‘SearchGPT’ नावाचा शोध इंजिन आणला आहे.

तुमच्या मनात हा विचार नक्कीच येईल की हे SearchGPT गुगलपेक्षा कसं वेगळं आहे. तर  गुगल आपल्याला सर्च केल्यावर लिंक्स देतो. पण SearchGPT या लिंक्सना समजून घेऊन त्यांचंयुझर ज्या भाषेत वापरतो त्या भाषेत सारांश तयार करतो आणि मग युझरसमोर माहिती मांडतो. उदाहरणार्थ, राजकारणाची सद्यस्थिती असा विषय शोधला तर SearchGPT तुम्हाला सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडींची माहिती एकत्रित करून सांगेल आणि नंतर प्रत्येकाबद्दल थोडक्यात माहिती देईल.

या माहितीसोबतच त्या माहितीची अधिकृत लिंकही देईल. हे SearchGPT अजून चाचणीच्या टप्प्यात आहे. सध्या फक्त 10,000 लोकांनाच ते वापरण्याची परवानगी आहे. पण लवकरच ते सर्वांसाठी खुले होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे भारतीयांना आता गुगलसोबत पर्याय उपलब्ध आहे. SearchGPT वापरताना कंपनीने केलेल्या दाव्याप्रमाणे गुगलपेक्षा चांगला अनुभव खरंच मिळतो हे पाहण्यासारखे असेल.

आजवर आपण माहिती शोधण्यासाठी गुगलवर अवलंबून होतो. पण आता कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान विकसित होत असल्या कारणाने तंत्रज्ञानात वेगवेगळ्या अपडेट येत आहेत. ओपन एआयचे हे सर्च इंजिन नक्कीच धमाकेदार ठरेल अशी जगभरातून आशा व्यक्त केली जात आहे.

सर्च जीपीटी हे गुगलपेक्षा अधिक प्रगल्भ आणि अद्ययावत असेल असे देखील कंपनीकडून सांगण्यात आले आहे. SearchGPT अजूनही चाचणीच्या टप्प्यात असले तरी ज्या दहा हजार लोकांना सर्च जीपीटी वापरण्यासाठी देण्यात आले आहे, त्यांच्याकडून चांगले रिझल्ट मिळत असल्याचे बोलले जात आहे. अशात गुगल सर्च इंजिन मैदानात उतरून आणखी काहीतरी नवीनतम करून दाखवते का आणि सर्च इंजिनच्या क्षेत्रात अव्वल स्थान कायम ठेवते का हे पाहण्यासारखे असेल.

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.