creditcard

मुंबईत Coronavirus मुळे एका डॉक्टरचा मृत्यू; घरातले 6 जणही निघाले पॉझिटिव्ह

axis

मुंबई, 27 मार्च : देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत आणखी एका रुग्णाचा Coronavirus ने बळी घेतल्याचं समोर आलं आहे. इथल्या हिंदुजा रुग्णालयात काल रात्रीच एका 82 वर्षांच्या डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यांची Covid-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

No posts found.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार या डॉक्टरांचा नातू 12 मार्चला ब्रिटनहून परत आला होता. तो सेल्फ क्वारंटाइन होता. पण तरीही त्याच्या घरातल्या सर्वच्या सर्व 6 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोरोनाव्हायरसचं थैमान जगभरात आता पुढच्या टप्प्यात पोहोचल्याचं स्पष्ट आहे. 5 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे आणि मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे 24,057 एवढे मृत्यू जगभरात झाले आहेत.