Breaking: हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS जनरल बिपिन रावत यांचे निधन

भारताचे सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आहे.

हवाई दलाने याबाबतची माहिती दिली आहे.

अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून १४ जण प्रवास करत होते..

या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश हवाई दलाने दिले आहेत.

लष्कराचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर होते अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बिपिन रावत यांच्यासोबत १४ जण प्रवास करत होते. यामध्ये त्यांची पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट होते. या सर्वांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

कून्नूर इथं अपघात झाला. प्रवासावेळी दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च दर्जाची हेलिकॉप्टर वापरली जातात तरीही अशा प्रकारच्या दुर्घटनेमुळे सुऱक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News