मुंबई (प्रतिनिधी): राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची तयारी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी सर्व पक्षीय बैठक होणार आहे. बैठकीत कोविडच्या कोरोनाबाधीत रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे.
पुढील आठवड्यात सुट्ट्या अधिक असल्यामुळे संपूर्ण आठवडाभर कडक लाँकडाऊन करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिलीय. या बैठकीत राज्यात पुढील पूर्ण आठवडा लावून लावण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.
उद्याच्या बैठकीत मागील वर्षी जसा कडक लॉकडाऊन होता तसा लावण्याबाबत चर्चा होणार आहे. मागील वर्षी कडक लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता कोणालाही बाहेर पडता येत नव्हतं. तसा लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.
या बैठकीला महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे प्रमुख नेते, भाजपचे नेते त्याचबरोबर मनसे, रिपाई, समाजवादी पक्ष यासह सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलवण्यात आलं आहे.