नवी दिल्ली, राजस्थान आणि गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे.
मुंबई (प्रतिनिधी): नवी दिल्ली, राजस्थान आणि गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. महाराष्ट्रात यायचं असेल तर सोबत कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणावा लागेल. अन्यथा तुम्हाला आल्या पावली परत पाठवलं जाईल, असं राज्य सरकारने नव्या नियमावलीत नमूद केलं आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यातील नागरिकांना महाराष्ट्रात येताना कोरोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्रं सोबत आणावं लागणार आहे.