कोरोना रुग्णांची वाढती संख्या; पुणे शहरातून चिंताजनक आकडेवारी

पुणे ; पुणे शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.पुणे जिल्ह्यात काल (सोमवारी) दिवसभरात 2601 कोरोना रूग्णांची वाढ झाली असून 44 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे शहरासह जिल्हाभरातील कोरोना रूग्णांचा आकडा 54 हजारांवर पोहचला आहे. पुणे शहरात 1690 तर पिंपरी चिंचवडमध्ये 657 रूग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागातही 171 रूग्णांची वाढ झाली.

रुग्णवाढीसोबतच पुणे शहरातून एक चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजाराहून अधिक झाली आहे. मात्र त्याचवेळी कालच्या आकडेवारीतून पुणे ग्रामीणला एक दिलासा मिळाला. पुणे ग्रामीण भागात काल एकही मृत्यू झाला नाही. तसंच पुणे ग्रामीणचा आत्तापर्यंतचा मृत्यू दरही 1.78 टक्के इतका कमी आहे.

दरम्यान, पुणे शहरात निर्माण झालेल्या बेड्सच्या प्रश्नावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीची बैठक घेत उपलब्ध बेड्स आणि नजीकच्या काळातील आवश्यक असणाऱ्या बेड्सच्या संख्येचा आढावा घेत ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्स तातडीने उपलब्धत करण्याच्या सूचना दिलेल्या असून कमी कालावधीतच बेड्स प्रश्न सुटणार आहे.

बैठकीला उपमहापौर सरस्वती शेंडगे, विभागीय आयुक्त विशेष अधिकारी सौरव राव, सभागृह नेते धीरज घाटे, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतानु गोयल, नगरसेवक दीपक पोटे, अजय खेडेकर, सुशील मेंगडे, आनंद रिठे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ससूनमध्ये साधारण नवीन 630 बेड्स उपलब्ध केले जाणार आहेत. त्यात आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर बेड तयार केले जाणार आहेत. तसेच महापालिकेच्या दळवी हॉस्पिटल, बोपोडी हॉस्पिटल, खासगी हॉस्पिटलमध्ये ज्युपीटर, संचेती हॉस्पिटलमध्ये नवीन 125आयसीयू बेड्स आणि 100 ऑक्सिजन बेड्स लवकरच उपलब्ध केले जाणार आहेत. तसेच PMRDA च्या माध्यमातून बालेवाडी येथे 800 बेड्स नव्याने उपलब्ध केले जाणार आहेत. त्यात 200 आयसीयू आणि 600 ऑक्सिजन बेड्सचा समावेश असेल. यात पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राज्यसरकार यांच्या माध्यमातून पुढील काहीच दिवसात उपलब्ध केले जाणार आहेत. तसेच पुणे महापालिकेच्या माध्यमातून 3 ऑगस्टपर्यंत 600 ऑक्सिजन बेड्स तयार केले जात आहेत. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये 10 टक्के बेड्स ऑक्सिजनचे केले जाणार आहेत. येत्या 2 दिवसात 50 ऑक्सिजन बेडस तात्काळ केले जाणार आहेत.

महापौर मोहोळ यांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीमुळे गंभीर रुग्णांना भेडसावणाऱ्या बेड्सच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. गेल्या आठवडाभरापासून पुणे शहरात नव्या कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बेडच्या संदर्भात मोठ्या अडचणी निर्माण होऊन पुणेकरांचा तक्रारी वाढत होत्या महापौर मोहोळ यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या विषयात लक्ष घालून नव्या भेटच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे.

यासंदर्भात माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘शहरात ऑक्सिजन, आयसीयू आणि वेंटीलेटर बेड्सची तातडीने आवश्यकता असून यासाठी आम्ही वेगाने पावले उचलत आहोत. बैठकीच्या माध्यमातून आढावा घेत नजीकच्या काळातील नियोजन करणे आवश्यक होते, याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपलब्ध बेडच्या संख्येची सविस्तर माहिती घेत नव्याने कराव्या लागणाऱ्या बेडच्या निर्मितीबाबत सविस्तर चर्चा करून प्रशासनाला निर्देश दिले आहेत. माझी पुणेकरांना विनंती आहे, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत सहकार्य करावे. टेस्टची संख्या वाढविल्याने पुणे शहरात रुग्ण संख्येचे प्रमाणही अधिक होत आहे. जागतिक पातळीवर विचार केला तर, ज्यांनी टेस्टिंगची संख्या वाढविली अशा भागात वेगाने संसर्गावर नियंत्रण मिळवता आले आहे. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून न जाता आगामी काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.