आधार अपडेट करा, यूआयडीएआयनं वाढवली मुदत, जाणून घ्या शेवटची तारीख

नवी दिल्ली: आधार कार्डची नोंदणी करताना अनकेदा काही चुका राहून जातात. अनेकदा काही जणांना स्थलांतर केल्यानं आधार कार्डमधील माहिती बदलावी लागते. आधार कार्ड अनेक ठिकाणी महत्त्वाचे कागदपत्र म्हणून जमा करावे लागेत. आधार कार्डमधील माहिती बदलायची असल्यास किंवा अपडेट करायची असल्यास मोठी संधी आहे.

यूआयडीएआयनं आधार कार्ड धारकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबर पर्यंत मुदत आहे. बायोमेट्रीक नोंदी अपडेट करणे किंवा फोटो बदलण्यासाठी देखील या सुविधेचा लाभ घेता येईल. 

केंद्र सरकारच्या आवाहनानुसार ज्या नागरिकांचं आधार कार्ड 10 वर्षांहून जुनं असेल त्यांना माहिती अपडेट करणं आवश्यक आहे. जर तुमचं आधार कार्ड देखील 10 वर्षांपेक्षा जुनं असेल तर त्यातील नोंदी अपडेट करण्याची गरज आहे. यूआयडीएआयनं वाढवलेल्या मुदतीमध्ये तुम्ही आधार कार्ड अपडेट केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागणार नाही. 

मुदतवाढ करत असल्याची यूआयडीएआयची घोषणा:
यूआयडीएआयनं आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी मुदतवाढ दिल्याची घोषणा ट्वीट करुन दिली आहे. यूआयडीएआयनं याबाबत माहिती दिली आहे. ही मुदत 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ही सुविधा केवळ माय आधार पोर्टलवर उपलब्ध असेल. आधार केंद्रावर जाऊन माहिती अपडेट केल्यास रक्कम द्यावी लागेल. 

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. तुमच्याकडे ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा असणं आवश्यक आहे. ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र तुम्ही वापरु शकता. आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढवण्यात आलेली आहे. जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल तर तुम्हाला अपडेट करणं आवश्यक आहे.  

आधार कार्ड कसं अपडेट करायचं? तुम्ही घरबसल्या आधार कार्ड अपडेट करु शकता.
स्टेप 1 : तुम्ही सर्वप्रथम UIDAI ची अधिकृत वेबसाइट myaadhaar.uidai.gov.in ला भेट द्या.
स्टेप 2 :  यानंतर Update Aadhaar चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
स्टेप 3 :  तिथं तुम्ही आधार नंबर नोंदवा आणि त्यानंतर ओटीपी नंबर द्या.
स्टेप 4 : यानंतर तुम्हाला कागदपत्रं अपडेट करुन पडताळणी करावी लागेल. 
स्टेप 5 : यानंतर तुम्ही तुमचं ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा असलेली कागदपत्र स्कॅन करुन अपलोड करा.
स्टेप 6 :  आता तुम्ही Submit वर क्लिक करा आणि त्यानंतर रिक्वेस्ट नंबर जनरेट होईल. त्याद्वारे आधार अपडेटची स्थिती जाणून घेऊ शकता.

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.