या १० बँकांचे चार बँकांमध्ये होणार एकत्रीकरण

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सार्वजनिक क्षेत्रातील आणखी १० बँकांच्या एकत्रीकरणाला मंजुरी दिली आहे. १० बँकांचे एकत्रीकरण करून ४ बँका अस्तित्वात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली. येत्या एप्रिलपासून एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

बुधवारी घेतलेल्या निर्णयानुसार, पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या तीनही बँकांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. त्यातून अस्तित्वात येणारी बँक ही एसबीआयनंतरची देशातील दुसरी सर्वात मोठी बँक ठरणार आहे. कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक यांचे विलीनीकरण होईल.

त्यातून अस्तित्वात येणारी बँक देशातील चौथी सर्वात मोठी बँक असेल. तसेच इंडियन बँक आणि अलाहाबाद बँकेचे एकत्रीकरण होणार आहे.

केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे एकत्रीकरण करून त्यातून चार नव्या बँकांची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा ऑगस्टमध्ये केली होती. त्याला आज कॅबिनेटने मंजुरी दिली. केंद्राच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या आता २७ वरून १२ वर येणार आहे. यापूर्वी सरकारने भारतीय स्टेट बँकेत पाच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँक यांचे विलीनीकरण केले होते. त्यानंतर बँक ऑफ बडोदामध्ये देना आणि विजया बँकेचे विलिनीकरण करण्यात आले.

अशा प्रकारे होणार एकत्रीकरण
=पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील तीन बड्या बँकांची एक मोठी बँक अस्तित्वात येईल.
=कॅनरा बँक आणि सिंडिकेट या दोन बँकांचे विलिनीकरण होणार आहे.
=युनियन बँक, आंध्रा बँक आणि कार्पोरेशन बँक यांची मिळून देशातील पाचवी सर्वात मोठी बँक अस्तित्वात येईल.
=इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक यांचे एकत्रीकरण होणार

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.