मुंबई (प्रतिनिधी): जर तुम्हीही दोन हजार रुपयांच्या बनावट नोटेमुळे चिंतेत असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे.
सरकारने लोकसभेत माहिती दिली आहे की बँकिंग प्रणालीमध्ये 2000 रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय घटले आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, 2018 ते 2020 दरम्यान अशा बनावट नोटांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, आता ही आकडेवारी घसरत आहे.
सरकारला विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना ही माहिती दिली. 2000 च्या बनावट नोटांची संख्या आणि त्या नियंत्रित करण्याच्या पद्धती विचारण्यात आल्या होत्या.
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सदनात दिलेल्या माहितीत सांगितले की, आता बँकिंग व्यवस्थेत 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, 2018 ते 2020 दरम्यान अशा बनावट नोटांच्या संख्येत वाढ झाली होती, परंतु आता ती कमी होत चालली आहे. भाजप खासदार रंजनबेन धनंजय भट्ट यांनी बनावट नोटांची संख्या आणि त्यांना हाताळण्याचे मार्ग याबाबत प्रश्न विचारला होता.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीच्या आधारे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2021-22 मध्ये देशाच्या बँकिंग प्रणालीमध्ये 2,000 रुपयांच्या 13,604 बनावट नोटा पकडल्या गेल्या आहेत, जे 2,000 रुपयांच्या सर्व नोटांच्या 0.00063 टक्के आहे. 2018 ते 2020 या काळात बनावट नोटांची संख्या वाढत होती. 2018 मध्ये 54,776 बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या. 2019 मध्ये 90,556 नोटा पकडल्या गेल्या होत्या. आतापर्यंत एकूण अडीच लाख बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत. 90 टक्के बनावट नोटांमध्ये सुरक्षिततेची सर्व चिन्हे होती, परंतु त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट होता.