मोबाइल स्क्रिनवर दिसेल कॉलरचं KYC आधारित नाव, TRAI कडून नव्या सिस्टमवर काम सुरू
नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) लवकरच एका नव्या सिस्टमवर काम सुरू करणार आहे.
या सिस्टममध्ये कॉलरचे अर्थात कॉल करणाऱ्या व्यक्तीचं KYC आधारित नाव फोन स्क्रीनवर दिसेल.
ट्रायचे अध्यक्ष पीडी वाघेला यांनी सांगितलं, की हे सिस्टम सुरू करण्यासाठी पुढील दोन महिन्यात चर्चा सुरू होऊ शकते.
ट्रायला या सिस्टमवर चर्चा सुरू करण्यात दूरसंचार विभागाकडून संकेतही मिळाले आहेत.
- नाशिक: पिता- पुत्र जगदीश आणि प्रणव जाधव यांच्या मृत्यूबाबत पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा…
- नाशिक हादरलं: ‘या’ कारणामुळे मित्रांनीच केली प्रथमेशची हत्या…
- नाशिक: पौर्णिमा बस स्टॉप येथे झालेल्या हत्येचा उलगडा; तीन संशयित ताब्यात
ज्यावेळी कोणी कॉल करेल त्यावेळी त्याचं मोबाइल कंपन्यांकडून केलं गेलेलं केव्हायसी आधारित नाव मोबाइलवर स्क्रिनवर येईल. हे सिस्टम दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार, दूरसंचार कंपन्यांकडून केल्या गेलेल्या केव्हायसीनुसार कॉल करणाऱ्यांचं नाव मोबाइल स्क्रिनवर दाखवण्यास सक्षम असेल. नव्या सिस्टममुळे KYC आधारित ओळख करण्यास मदत होईल. हे सिस्टम कॉलरची ओळख किंवा नाव दाखवणाऱ्या काही Apps पेक्षा अधिक अचूकता आणि पारदर्शकता आणेल.
या केव्हायसी आधारित नव्या सिस्टमसाठी ब्लू प्रिंट तयार झाल्यानंतर ओळख अधिक स्पष्ट आणि कायदेशीर रुपात मान्य होईल. याचा परिणाम म्हणजे युजर्सची फसवणूक टळेल. तसंच क्राउडसोर्सिंग Apps वर डेटा क्लिअर होईल.
पीडी वाघेला यांनी सांगितलं, की लवकरच या सिस्टमवर काम सुरू केलं जाईल. ज्यावेळी कोणी कॉल करेल त्यावेळी त्याचं केव्हायसी आधारित नाव मोबाइल स्क्रिनवर येईल. ट्राय आधीपासूनच या सिस्टमवर काम करण्यासाठी विचार करत आहे. आता दूरसंचार विभागाच्या विशेष सल्ल्यानंतर यावर लवकरच काम केलं जाईल असं ट्रायचे अध्यक्ष पीडी वाघेला यांनी सांगितलं