Aadhar Card: तुमच्या आधार कार्डसोबत किती नंबर आहेत लिंक; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आपल्याकडे आधार कार्ड असल्याने आपल्याला इतर कागदपत्रांची फारशी गरज पडत नाही.
परंतु आधार कार्डवर एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर लिंक असतील तर त्याची माहिती आता दूरसंचार विभागातर्फे देण्यात येणार आहे.
सध्या देशात कुठल्याही सरकारी योजनेसाठी किंवा इतर कामांसाठी आपल्याला आधार कार्ड असणं गरजेचं बनलं आहे. कारण त्या एकाच नंबरवर आपला सर्व डाटा जमा केलेला असल्याने आपल्याला इतर कागदपत्रांची फारशी गरज पडत नाही. परंतु तुमच्या आधार कार्डवर एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर लिंक असतील तर त्याची माहिती आता दूरसंचार विभागातर्फे देण्यात येणार आहे.
या विभागाकडून एक DoT पोर्टल जारी करण्यात आले असून त्यात आपल्या आधार कार्डवर असलेल्या लिंक मोबाईल नंबरची माहिती दिली जाणार आहे. त्यातबरोबर एका आधार कार्डवर आता 9 नंबर्सची माहिती मिळणार आहे. या विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या या योजनेला टेलीकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अॅन्ड कंज्यूमर प्रोटेक्शन (TAFCOP) असंही म्हटलं जात आहे.
या योजनेमार्फत आपल्याला आपल्या आधार कार्डवर असलेल्या लिंक नंबरची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळं आता या पोर्टलमार्फत नागरिकांच्या आधार नंबर आणि त्यांच्या प्रायव्हसीत वाढ होणार आहे. त्यामुळं आता प्रत्येकाला आपल्या आधार कार्डसंदर्भात ही माहिती मिळवता येईल.
आपल्या आधार कार्डवरील मोबाईल नंबर्सची माहिती घेण्यासाठी सर्वात आधी TAFCOP च्या अधिकृत https://tafcop.dgtelecom.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. त्यानंतर त्या पोर्टलवरून आपल्या मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला OTP येईल. तो OTP त्याठिकाणी टाका. त्यानंतर लॉगिन करा. लॉगिन झाल्यानंतर आता त्या पोर्टलवर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर लिंक असलेले मोबाईल नंबर दिसतील. या पद्धतीमुळं आता आधार कार्डची सुरक्षितता वाढणार आहे. त्याचबरोबर आधार कार्ड वापरकर्त्यांमध्येही आपल्या कार्डवर किती नंबर लिंक आहे हे कळणार असल्यानं याचा फायदा आधार वापरकर्त्यांना होणार आहे.