ब्रिटन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिएंट; चीनमध्ये Corona returns, अनेक ठिकाणी Lockdown

ब्रिटन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिएंट; चीनमध्ये Corona returns, अनेक ठिकाणी Lockdown

कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा एकदा चीन (China), रशिया (Russia) आणि ब्रिटनमध्ये (Britain) थैमान घालण्यास सुरुवात केल्याचं पहायला मिळत आहे.

चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या असून अनेक ठिकाणी शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. तर तिकडे ब्रिटन आणि रशियात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. यामुळे चिंता वाढवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या उत्तर आणि उत्तर पश्चिम शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. परदेशातून येणाऱ्या काही प्रवाशांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं बोललं जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चीन प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणात टेस्टिंग सुरु करण्यात आलं आहे. यासोबतच पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. मनोरंजन स्थळेही काही भागात बंद करण्यात आली असून अनेक भागांत लॉकडाऊन जाहीर कऱण्यात आला आहे.

वाढत्या संक्रमणामुळे Xi’an आणि Lanzhou भागांत 60 टक्के फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. इनर मंगोलिया येथे कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. हुनान आणि शांग्जी प्रांतात सुद्धा कोरोनाच्या आकडेवारीत वाढ होत आहे. परदेशातून आलेले जवळपास 25 प्रवासी हे कोरोना बाधित असल्याचं आढळून आलं आहे. दिलासा देणारी बातमी म्हणजे कोरोनामुळे नव्याने एकही मृत्यू झालेला नाहीये.

रशियामध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या (Covid-19 Delta Variant) सबव्हेरिएंटची (Sub Variant of Delta) अनेक प्रकरणं समोर आली आहेत. असं म्हटलं जात आहे की हा प्रकार पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य आणि प्राणघातक ठरू शकतो. कामिल खाफिजोफ नावाच्या संशोधकाने सांगितलं की AY.4.2 चा सबव्हेरिएंट सुमारे 10 टक्के अधिक प्राणघातक आहे, ज्यामुळे रशियामध्ये अनेक नवीन प्रकरणे आणि मृत्यू नोंदवले जात आहेत. मात्र, सध्या त्याच्या प्रसाराची गती मंद आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी म्हटलं की कोरोनाच्या या व्हॅरिएंटविरोधात लस प्रभावी आहे.

AY.4.2 सबव्हेरिएंटची प्रकरणे इंग्लंडमध्ये वाढत आहेत. ब्रिटेनमध्ये 27 सप्टेंबरपासून वाढलेल्या रुग्णसंख्येत 6 टक्के प्रकरणं याच व्हेरिएंटची आहेत. यूके आरोग्य सुरक्षा एजन्सीच्या रिपोर्टमध्ये 15 ऑक्टोबरला हा खुलासा केला गेला आहे. ब्रिटेनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी बुधवारी म्हटलं, की सध्या असं समजण्याचं काही कारण नाही की हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकतो.

रशियाचे इम्यूनोलॉजिस्ट निकोले क्रुश्कोव म्हणाले, डेल्टा आणि त्याचे सबव्हेरिएंट भविष्यातही प्रभावीच राहतील. हे व्हेरिएंट काही प्रकारच्या लसींनाही अप्रभावी करू शकतात. विशेषत: जेथे लसीकरण दर 50 टक्क्यांपेक्षा कमी किंवा जवळजवळ समान आहे. ते म्हणाले की तरीही यात काही मोठा बदल होईल असे वाटत नाही. कारण कोरोना व्हायरसची देखील एक मर्यादा आहे आणि कोरोनाचे रुद्र रूप याआधीच पाहायला मिळालं आहे.

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.