प्रेयसीसाठी पुण्याच्या आजोबांचा कारनामा, खून करून बॉडीला घातले स्वत:चेच कपडे, दहावाही उरकला!

प्रेयसीसाठी अगदी काहीही करायला तयार असणारे प्रियकर आपण फक्त चित्रपटच नाही तर खऱ्या आयुष्यातही बघतो. पुण्याच्या आजोबांनी मात्र प्रियसीसोबत राहण्यासाठी भलताच कारनामा केला आहे, ज्यामुळे त्यांना जेलची हवा खायला लागत आहे. प्रेयसीसोबत राहण्यासाठी स्वत:च्या खुनाचा बनाव 65 वर्षांच्या या व्यक्तीने केला आहे. यासाठी त्याने एका व्यक्तीचा खून केला, तसंच त्याचं शीरही धडावेगळं केलं. या मृतदेहाला त्याने स्वत:चे कपडे घातले.

खून करून आणि डेडबॉडीला स्वत:चेच कपडे घालून हा नराधम थांबला नाही, तर त्याने हा मृतदेह पुन्हा रोटर मशिनमध्ये फिरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे नावाच्या व्यक्तीस अटक केली आहे. 10 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत रवींद्र भीमाजी घेनंद नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे खून केल्यानंतर आरोपी फरार झाला होता, तसंच त्याच्यावर मृत्यूनंतर केले जाणारे सगळे विधीही करण्यात आले. अगदी दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाचे बॅनरही गावात लावण्यात आले आणि दशक्रिया विधीही उरकला गेला.

पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे जिवंत असल्याचं समजलं. यानंतर पोलिसांनी तपास केला आणि सुभाष थोरवेला अटक करण्यात आली. याप्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत.

पत्नीने आत्महत्या केली अन् यांनी गुण उधळले:
सुभाष थोरवेंचे त्यांच्याच शेतात कामासाठी येणाऱ्या एका महिलेशी विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले. याची खबर थोरवेंच्या पत्नी आणि मुलांनाही लागली होती. मुलांनी त्यांचा संसार वेगळा थाटला होता. मात्र पत्नीला हे पचनी पडत नव्हतं. यातूनच त्यांनी काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. मात्र यातून 65 वर्षीय सुभाष यांनी कोणताही धडा घेतला नाही. उलट या घटनेनंतर त्यांना सगळ्याचं स्वातंत्र्य मिळालं. याचाच फायदा घेत त्यांनी प्रेमसंबंध असणाऱ्या विवाहित महिलेसोबत गावापासून लांब जाऊन राहण्याचा डाव आखला. यासाठीच सुभाष यांनी स्वतः मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचं ठरवलं. .

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.