प्रत्येक मनोकामना होईल पूर्ण, या विधीने करा श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत…
नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत, व्रताचे नियम, पूजाविधी जाणून घेऊया : या व्रताला कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून सुरुवात करता येते. नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करुनच व्रताला आरंभ करावा. व्रतसंकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करावा.
साहित्य : ताटात हळद कुंकु, अक्षता, तुपाचा दिवा, कापसाची दोन वस्रे, स्वामींना पाघरायला भगवे वस्र, गुळखोबर १ताम्हन, तांब्या, पळी, अष्टंगंध,जान्हव, हिना अत्तर, उगाळलेल चंदन, विविध फुले (जास्वंद, चाफा, गुलाब, दूर्वा, बेल, १जुडी तुळस, ईतर फुले) ठेवावे. स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा. फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता, पळीभर पाणी, तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा.
पूजाविधी: व्रताला प्रारंभ करावयाच्या गुरुवारी सुर्योदयाच्या वेळेस स्नान करुन शुचिर्भुत व्हावे, नित्याची देवपूजा अटोपून घरातील देवासमोर एक नारळ, विडा ठेवून (दोन नागवेलीची पाने पैसा ,एक सुपारी ) नमस्कार करावा. वडील मंडळीनाही नमस्कार करावा. पूजेला प्रारंभ करावा.
जमिनीवर चौरंग ठेवुन सभोवती हळदीकुंकु वापरुन रांगोळी काढावी. मध्ये स्वस्तिक काढावे. त्यावर चौरंग ठेवून भगवे अथवा पिवळे वस्र अंथरुन मध्यभागी वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंधाक्षता,तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा.
(वडाच्या पानाचा देठ भिंतीकडील बाजूस असावा) आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजनाकरीता सुपारी ठेवावी. डाव्या बाजूला घंटा ठेवावीचौरंगाच्या शेजारी समई लावावी. सुंगधी अगरबत्ती धूप लावावा. चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा.
संकल्प : मम आत्मनः श्रृतिस्मृतिपुरानोक्तफल प्रात्यर्थम, मम सकल कुंटुंबिनाम, क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर्यभीवृध्दार्थम, पुत्रपौत्र, संततिवृध्दी,अप्राप्तलक्ष्मीप्राप्त्यर्थम, प्राप्तलक्ष्मीचिरकाल संरक्षणार्थम्, अदित्यादि सकल ग्रहपीडाशांतर्थम् एवं सकल कामनासिध्दिद्वारा धर्मार्थम् मोक्षफल प्राप्त्यर्थम् श्रीस्वामी समर्थ देवता पूजनं एवं व्रतकथा श्रवणं च करिष्ये ।
असे म्हणून हातातील पाणी ताम्हानात सोडावे. गणपतीचे ध्यान करुन ॐ गं गणपतये नमः। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धिमही, तंन्नो दंती प्रचोदयात।। असा मंत्र म्हणून गणपतीपूजनाकरीता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी अष्टगंध मिश्रीत जल अर्पण करुन सुपारीला चंदन लावावे. हळद कुंकु वाहून दूर्वा, लाल फुलं, बेल,कापसाची दोन वस्रे ,जानवे, अक्षता अर्पण करुन नमस्कार करावा.धूप दिप अगरबत्ती दाखवावी. तुपाचा दिवा ओवाळावा. गुळ खोबर्याचा नैवेद्य दाखवावा.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा ।। असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा. घंटा वाजवावी. घंटेला हळद कुंकु अक्षता, गंध ,फुल अर्पण करुन अगरबत्ती, धूप दाखवावा. दीप ओवाळून घंटा वाजवावी. नमस्कार करावा.
व्रताचे नियम : सुर्योदयाच्या वेळेस, स्नान करुन शुचिर्भूत व्हावे. दिवसभर उपवास करावा. दुपारी फलाहार व दूध उपवासाला चालणारे पदार्थ खावेत. संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा.
स्रियांचा मासिक धर्म तसेच सोयर सुतक आल्यास व्रताचरण करु नये. उपवास मात्र करावा. जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करुन ९ गुरुवारची संख्या पूर्ण करुन त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे.
अतिमहत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये. दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करावा. मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे. व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा. तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार एक गुरुवार अधिक करुन त्यानंर उद्यापन करावे.
शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी, यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरिता बोलवावे. हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुलामुलींनाही करता येते. सपत्निक केल्यास अधिक उत्तम. पूजेकरिता सुपारी, फळे उत्तम प्रतीची असावी. फुले अगरबत्ती, धुप सुवासिक असावे. दिवा शुध्द तुपाचा असावा. रात्री भजन, गायन, किर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे. व्रताचे दिवशी तसेच उद्यापनाचे दिवशी दर्शनार्थ येणार्या प्रत्येक स्रीपुरुषांना या पोथीची एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी.
९ गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दहीभात ठेवावा. मुंग्यांना चिमूठभर साखर ठेवावी. गाईला चारा घालावा. कुत्र्याला पोळी द्यावी. गरीबाला शिजलेले अन्न द्यावे. श्री स्वामी समर्थ…
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.