पाच लाखांची लाच घेतल्याप्रकरणी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक अनिल जाधव यांना अटक
मुंबई (विशेष प्रतिनिधी): विविध कोर्स घेण्यासाठी मंजुरी देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक अनिल जाधव यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईच्या कार्यलयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात जाधव हे रंगेहाथ सापडले.
झडतीमध्ये मुंबईतील त्यांच्या घरात सापडली दीड किलो सोन्याची नाणी बिस्किटे. रोकड रकमेसह एक कोटी 69 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रेस नोट जरी केली आहे. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , मुंबई विभाग येथे दिनांक ०७१२.२०२१ रोजी लाचेच्या मागणी संदर्भातील प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक १४.१२.२०२१ रोजी केलेल्या पडताळणी दरम्यान यातील अनिल मदनजी जाधव , वय ५२ वर्षे , सहसंचालक , शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय , शासकिय तंत्रनिकेतन परिसर , खेरवाडी , वांद्रे ( पुर्व ) , मुंबई यांनी यातील फिर्यादी यांचेकडे रु . ५,००,००० / – इतक्या रकमेची लाच स्वरुपात मागणी करून ती स्विकारण्याचे कबूल केले.
त्याप्रमाणे दिनांक ०४.०१.२०२२ रोजीच्या सापळा कारवाई दरम्यान अनिल मदनजी जाधव , वय ५२ वर्षे , सहसंचालक , शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय यांनी मागणी केलेली रु . ५,००,००० / – इतक्या लाचेची रक्कम फिर्यादी यांच्याकडुन स्विकारली असता, त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
म्हणून ला.प्र.वि. गु.र.क्र . ०१ / २०२२ कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १ ९ ८८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद गुन्हयाचे तपासाच्या अनुषंगाने यातील आलोसे अनिल मदनजी जाधव , वय ५२ वर्षे , सहसंचालक , शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय यांच्या मुंबई येथील राहत्या घराची झडती घेतली असता त्यांच्या राहत्या घरात रु . १,५ ९ , १०,२४५ / – ( एक करोड एकोणसाठ लाख दहा हजार दोनशे पंचेचाळीस ) किमंतीची मालमत्ता त्यापैकी सोन्यावी नाणी , बिस्कीटे , दागिने असे , १ किलो ५७२ ग्रॅम वजनाच्या अंदाजे किंमत रु . ७ ९ , ४६ , ७४५ / – किंमतीच्या सोन्या चांदीच्या मौल्यवान वस्तु व रु . ७ ९ , ६३,५०० / – ( एकोणऐंशी लाख त्रेसष्ट हजार पाचशे ) एवढी बेहिशोबी रोख रक्कम मिळून आली आहे.
तसेच आलोसे यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता , रोख रक्कम रु . २,२८,१०० / – एवढी बेहिशोबी रोख रक्कम मिळून आली आहे . अशी एकुण रु . १,६ ९ , ३८,३४५ / – ( एक करोड एकसष्ट लाख अडतीस हजार तीनशे पंचेचाळीस ) रक्कमेच्या मौल्यवान वस्तू व रोख रक्कम ताब्यात घेण्यात आल्या असून सदरबाबत पुढील तपास चालु आहे . सदर गुन्हयातील यशस्वी सापळा कारवाई स.पो.आ. आबासाहेब पाटील , पो.नि. सुप्रिया नटे व पथक तसेच घरझडती कारवाई स.पो.आ. प्रविण लोखंडे व पो.नि. गायत्री जाधव व पथक यांनी अपर पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली सहाय्यक दिनांक : ०५.०१.२०२२ / 2021