मी आदेश बांदेकरांचा नातेवाईक आहे, असं सांगत केली जातेय फसवणूक

मी आदेश बांदेकरांचा नातेवाईक आहे, असं सांगत केली जातेय फसवणूक

मुंबई (प्रतिनिधी): होम मिनिस्टरमुळे अभिनेते आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या घरात पोहचले. अभिनयाशिवाय ते राजकारण, सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

त्यांच्या याच प्रसिद्धीचा फायदा घेत काहीजण लोकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. आदेश बांदेकर यांचा मी नातेवाईक आहे असे सांगून काही जणांशी आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यांना ही गोष्ट समजताच त्यांनी सोशल मीडियावरून सर्वांना सर्तक राहण्याचे आवाहान केले आहे.

आदेश बांदेकर यांनी इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे की, “बांदेकर” हे आडनाव किंवा या आडनावाशी साध्यर्म साधणारे बरेचजण मनोरंजनाबरोबर विविध क्षेत्रात वावरत आहेत. यापैकी कोणाशीही व्यवहार करताना काळजी घ्यावी. माझे नातेवाईक आहे असे सांगून कोणी आपली फसवणूक केल्यास त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नसेल. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना सर्तक राहण्याचे आवहान केले आहे.आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर  (soham bandekar ) याने देखील यासंबंधी पोस्ट शेअर केली आहे. त्याच्याकडून देखील अशाच प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading