मोठी बातमी! अखेर शालेय शिक्षण विभागानं फी कपातीबाबत काढले आदेश; शाळांना दिल्या ‘या’ सूचना

मोठी बातमी! अखेर शालेय शिक्षण विभागानं फी कपातीबाबत काढले आदेश; शाळांना दिल्या या सूचना

मुंबई (प्रतिनिधी): काही दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शुल्कात करण्याबाबत घोषणा केली होती. मात्र काही शाळांनी यावर आक्षेप घेतला होता. म्हणूनच आता शालेय शिक्षण विभागानं शुल्क कपातीबाबत शासकीय आदेश काढले आहेत. पत्रक जारी करून आदेश देण्यात आले आहेत.

पालक संघटनांनी विद्यार्थ्यांची 15 टक्क्यांपेक्षा जास्त फी कमी करावी अशी मागणी केली होती पण शासनानं तुर्तास 15 टक्के शालेय फी कपात  करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमणे शाळांसाठी शासनानं आदेश काढले आहेत.

राज्यातील शाळांनी विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण थांबवू नये. जर पालकांनी फी पूर्ण भरली असेल तर पुढील वर्षात 15 टक्के कपात अथवा शाळा संस्थांनी 15 टक्के फी पालकांना परत द्यावी असे आदेश शालेय शिक्षण विभागानं दिले आहेत.

जर विद्यार्थ्यांना फी भरण्यात विलंब होत असेल तर कोणत्याही शाळेनं विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण बंद करू नये. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देणार नाही किंवा त्यांचा निकाल राखून ठेवण्यात येईल असे निर्णय घेऊ नये. फी कपातीबाबत कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास पालकांनी तक्रार निवारण समितीकडे तक्रार करावी असेही आदेश शासनानं दिले आहेत. वरील आदेश सर्व मंडळाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांना लागू असणार आहेत.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News