महाराष्ट्र हादरला! पत्नी-मुलाची हत्या केली, व्हिडिओ रेकॉर्डींग पाठवून मेहुण्याला म्हणाला…

महाराष्ट्र हादरला! पत्नी-मुलाची हत्या केली, व्हिडिओ रेकॉर्डींग पाठवून मेहुण्याला म्हणाला मयताला ये…

कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात कुदळीने वार करून आधी तिला ठार केले.

त्यानंतर पोटच्या मुलालाही आंब्याच्या झाडाला फाशी देऊन नराधम बापाने संपवल्याची घटना श्रीरामपूरच्या दिघी तालुक्यात घडली.

एका नराधमाने पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलाची हत्या करुन त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं,

आणि ते नातेवाईकांना पाठवलं. रामनवमीच्या दिवशीच ही घटना घडल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे नेमकी घटना?
बलराज दत्तात्रय कुदळे असं आरोपीचं नाव असन तो ट्रकचालक आहे. आरोपी पत्नी अक्षदा आणि पाच वर्षांचा मुलाग शिवतेज यांच्यासह श्रीरामपुरमधल्या दिघी इथं शेतात राहत होता. आरोपी बलराज आणि त्याच्या पत्नीत गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद होता. दररोजच्या भांडणाला कंटाळून अक्षदा मुलासह माहेरी निघुन गेली होती. नुकतीच ती माहेरहून सासरी आली होती.

पण आरोपी बलराजच्या डोक्यातला राग शांत झाला नव्हता. रविवारी सकाळी अक्षदा घरात काम करत असताना बलराजने पाठिमागून येत तिच्या डोक्यात कुदळ घातली. हा घाव इतका जबदस्त होता की अक्षदाचा जागीच मृत्यू झाला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही त्याने पोटच्या मुलाला घराजवळ असलेल्या आंब्याच्या झाडाला दोरीने फाशी देऊन ठार केलं.

हत्या केल्याच्या घटनेचं रेकॉर्डिंग:
धक्कादायक म्हणजे मुलाचा जीव जाईपर्यंत दहा ते पंधरा मिनिटं तो तिथेच थांबला. या सर्व घटनेचं त्याने आपल्या मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि हा व्हिडिओ कुटुंबिय आणि गावकऱ्यांना पाठवला. चाकण इथल्या मेहुण्याला व्हिडिओ कॉल करुन त्याने पत्नी आणि मुलाचे मृतदेह दाखवले. तुझ्या बहिणीला आणि भाच्याला मारुन टाकलं, त्यांच्या मयताला ये असं सांगत आरोपीने कॉल कट केला.

आरोपी बलरामने स्वत: दिली पोलिस पाटलाला माहिती:
आरोपीने दिघीचे पोलिस पाटील यांना फोन करून दोघांना ठार केल्याची माहिती दिली. बलराम यानेच आपल्याला फिर्याद द्यायला जावे लागेल, असे पोलिस पाटील यांना सांगितले. भेदरलेल्या पोलिस पाटलांनी ‘तुम्ही इथेच बसा, मी फिर्याद देऊन येतो’, असे सांगून पोलिसांना घटनेची माहिती दिली. दुपारी पोलिस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. मायलेकाच्या हत्येनंतर संतप्त जमावाने आरोपीचे घर पेटवून दिले.

Loading