पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन;पाकिस्तानच्या 11 सैनिकांना कंठस्नान

टंगडार वव करनाह सेक्टरमध्ये साधारण 12 कुटुंबीयांनी घर सोडून जवळील सुरक्षित भागांमध्ये हलविण्यात आले होते.

श्रीनगर: पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा एकदा डोक वर काढत ऐन दिवाळीत त्यांनी कराराला कचऱ्याची टोपली दाखवल शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. भारताची सीमारेषा LOC जवळच्या 3 भागांमध्ये शुक्रवारी उशिरापर्यंत पाकिस्तानकडून शस्त्रसंघीचं उल्लंघन करत गोळीबार सुरू होता. या गोळीबाराला भारतीय सैन्यदलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आतापर्यंतच्या कारवाईत भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या 11 सैनिकांना कंठस्नान घातलं आहे. 12 सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय सैन्यानं तोफा आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीनं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

पाकिस्तानच्या सैन्याकडून उत्तर काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी तुफान गोळीबार करण्यात आला होता. ज्यामध्ये 4 सुरक्षा दलातील जवानांसह 10 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतीय सैन्याकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला. ज्यामध्ये पाकिस्तानी सैनिकांचे अनेक बंकर्स उद्ध्वस्त केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याच दरम्यान पाकिस्तानी सैनिकांना सडेतोड उत्तर देताना काही जवानही यामध्ये जखमी झाले आहेत.

Loading