नाशिक: ‘मला माफ करा..,’ म्हणत आवळला गळा, बापलेकांच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक: ‘मला माफ करा..,’ म्हणत आवळला गळा, बापलेकांच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक (प्रतिनिधी): काही दिवसांपूर्वी नाशिकमधील पंडित कॉलनी परिसरातील गोपाळ पार्कमधील रहिवाशी मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

त्यांची मालमत्ता हडप करण्यासाठी त्यांच्याच इमारतीमधील रहिवाशी राहुल गौतम जगताप यानं ही हत्या केली होती.

या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपीची चौकशी सुरू असताना बापलेकाच्या खून प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहूल याने 18 डिसेंबर रोजी मृत नानासाहेब कापडणीस यांना चर्चा करण्याच्या बहाण्याने आपल्या कारमध्ये बसवलं होतं. कारमध्ये चर्चा सुरू असताना दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी आरोपी राहूल याने नानासाहेब यांना जोरदार ठोसा लगावला होता. यामुळे नानासाहेब बेशुद्ध झाले होते. यानंतर घाबरलेल्या आरोपी शहराबाहेर निर्जनस्थळी कार घेऊन गेला. याठिकाणी त्यानं नानासाहेब यांच्या तोंडावर पाणी ओतून त्यांना शुद्धीवर आणलं.

यानंतर आरोपीनं ‘मला माफ करा…,’ असं म्हणत माफी मागितली. पण वाद मिटला नाही. दोघांमध्ये वाद वाढतच गेला. यावेळी आरोपीनं मला माफ करा म्हणत नानासाहेब यांचा गळा आवळला. नानासाहेब यांची हत्या केल्यानंतर आरोपी राहुलने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह थेट नाशिक जिल्ह्याच्या हद्दीबाहेर आंबोली घाटात नेला. याठिकाणी गेल्यानंतर आरोपीनं नानासाहेब यांच्या अंगावरील कपडे काढले आणि मृतदेह दरीत फेकला. पण मृतदेह दोन झाडांमध्ये अडकून बसला. यावेळी आरोपीनं दगड टाकून मृतदेह खाली पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अपयश आले.

त्यामुळे त्याने तेथील गवत पेटवून दिले. या धक्कादायक घटनेनंतर आरोपीनं परिसरातील गवत पेटवून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. पण हत्येचं गूढ उलगडत नव्हतं. दरम्यान आरोपी राहुल यानं मृत नानासाहेब यांचा मुलगा आमित यालाही गोड बोलून निर्जनस्थळी नेऊन डोक्यात दगड घालून हत्या केली. बापलेकाच्या मृत्यूने नाशिक शहर हादरलं होतं.

दुसरीकडे आरोपीनं मृत्याच्या डीमॅट अकाउंटमधून जवळपास 97 लाख रुपये आपल्या अकाउंटवर वळते करून घेतले होते. तसेच 2018 सालापासून घरावर थकित असलेल्या कर्जाची परतफेडही केली होती. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची चौकशी केली. यानंतर हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News