धक्कादायक! मुंबईला इलेक्ट्रिक बाइकमधील बॅटरीच्या स्फोटात सात वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी): वसई पूर्व भागातील रामदास नगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करत असताना अचानक स्फोट झाला, त्यामुळे घराला आग लागली. दरम्यान त्या आगीत भाजल्याने सात वर्षीय शब्बीर अन्सारी याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी वसई माणिकपूर पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

शब्बीरचे वडील शरफराज बेडरूममध्ये झोपले होते. तर शब्बीर आणि त्याची आजी हॉलमध्ये झोपली होती. यादरम्यान चॅर्जींग लावलेल्या बॅटरीने अचानक पेट घेतला आणि घराला आग लागली. दरम्यान शब्बीर त्या आगीत भाजला गेला. शरफराज यांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णाल्यात नेले परंतु त्याने अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी वसई माणिकपूर पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. चार्जींग सुरु असताना बॅटरीचा स्फोट कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.

याबाबत शब्बीरचे वडील शरफराज म्हणाले कि, “23 तारखेच्या पहाटे 2 वाजून 30 मिनीटांनी त्यांनी आपल्या इलेक्ट्रीक वाहनातील बॅटरी काढून चॅर्जींग लावले होते. ही बॅटरी चार्ज होण्यासाठी कमीतकमी 3 ते 4 तास लागतात. याचा अंदाज घेत शरफराज यांनी बॅटरी आपल्या घरातील हॉलमध्ये लावली होती. त्यामुळेच बॅटरी चार्ज करून झोपायला गेलो, अचानक पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मी झोपेतून उठून हॉलमध्ये आलो तेव्हा मला मोठा आवाज ऐकू आला, हॉलला आग लागल्याचे दिसले, छताच्या पंख्याला आग लागली होती. मी ताबडतोब माझ्या मुलाला आणि आईला उचलले आणि घराबाहेर आलो. मुलगा आगीत जळाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेले. ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटी आहे त्यांना मी एक विनंती करू इच्छितो की बाईकची बॅटरी घरात आणून चार्ज करू नका.”

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News