देश-विदेश: बाजारात मटण आणायला गेला आणि 12 कोटींचा मालक झाला; 72 वर्षाच्या पेंटरचे बदलले नशीब

आपणा प्रत्येकाला पैशांची खूप गरज असते.

त्यासाठी आपआपल्य़ा कामाच्या, धंद्याच्या ठिकाणी नवनवीन कल्पनांमधून आपण आपली आर्थिक स्थिती कशी सुधारु शकतो याचा विचार करतो.

मात्र याच वेळी एखादा लॉटरी लावणारा अचानक कसा मोठा होतो याचा आपण विचार करत असतो

आणि आपल्याही मनात लॉटरीचा विचार येतो असाच विचार एका व्यक्तीला काही तासांमध्ये कोट्याधीश करुन गेला आहे.

हो आयुष्याची 72 वर्षे कष्ट करण्यात घालवली मात्र त्याला अचानक लॉटरी लागली तो व्यक्ती म्हणजे केरळमधील कोट्टायम येथे राहणाऱ्या सदानंदन. सदानंदन याने काही तासांपूर्वी घतलेल्या लॉटरीच्या तिकीटामुळे आज तो 12 कोटींचा मालक बनला आहे.

कारण सदानंदन यांना 12 कोटींची बंपर लॉटरी सदानंद यांना लागली असून सदानंदन यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ही लॉटरी त्यांनी केरळ सरकारच्या ख्रिसमस New Year बंपर लॉटरीत जिंकली आहे. 50 वर्षांपासून सदानंदन पेंटिंगचे काम करत होते मात्र या लॉटरीने त्यांचे आयुष्यच बदलून गेले आहे.

केरळमधील कुदयमपाडी येथील रहिवासी असलेल्या सदानंदन यांनी सांगितले की, रविवारी सकाळी आपण बाजारातून मटण विकत घेण्यासाठी जात असताना सेल्वन नावाच्या तिकीट विक्रेत्याकडून मी लॉटरीचा ड्रॉ संपण्याच्या 5 तास आधी एका दुकानदाराकडून XG 218582 नंबरचे लॉटरी तिकीट खरेदी केले. हे तिकीट कोट्टायम शहरातील लॉटरी एजंट बिजी वर्गीस यांनी कुडेमपाडीजवळील पांडवम येथील लॉटरी विक्रेता कुन्नेपरंबिल सेल्वनला विकले.

हे तिकीट फक्त 300 रुपयांचे होते लॉटरीची दुसरी आणि तिसरी बक्षिसेही वितरीत करण्यात आली आहेत. द्वितीय पारितोषिक जिंकलेल्या 6 जणांना 3 कोटी रुपये तर तृतीय पारितोषिक जिंकणाऱ्या ६ भाग्यवान विजेत्यांना 60 लाख रुपये देण्यात आले आहेत.

Loading