देशात कोरोनाचा विस्फोट, एकाच दिवसात सापडले तब्बल 90 हजारहून अधिक रुग्ण

एकाच दिवसात आज तब्बल 90 हजार 802 रुग्ण सापडले. तर, 1016 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

मुंबई: देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विस्फोट झालेला दिसत आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 42 लाखांहून अधिक झाली आहे. तर, एकाच दिवसात आज तब्बल 90 हजार 802 रुग्ण सापडले. तर, 1016 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या सध्या 42 लाख 04 हजार 614 झाली आहे.

तर, सध्या देशात 8 लाख 82 हजार 542 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 32 लाख 50 हजार 429 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील मृतांचा आकडा हा 71 हजार 642 झाला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं दिलेल्या माहितीनुसार, 6 सप्टेंबरपर्यंत देशात 4 कोटी 95 लाख 51 हजार चाचण्या करण्यात आल्या. यात एकाच दिवसात 7 लाख 20 हजार चाचण्या झाल्याची नोंद आहे.

भारतानं ब्राझीलला टाकलं मागे

या वाढत जाणाऱ्या रुग्णांमुळे भारताने आता ब्राझीलला मागे टाकला असून जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता भारतापुढे फक्त अमेरिकेचा क्रमांक लागतो. ब्रझीलमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 40 लाख 91 हजार 801 एवढी असून 1 लाख 25 हजार 500 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ही 62 लाखांपेक्षाही जास्त असून 1 लाख 88 हजार 000 जणांचा मृत्यू झाला आहे.

Loading