दहावीचा निकाल जाहीर, कधी आणि कशी मिळेल मार्कशीट?

CBSE बोर्डाने दहावीच्या Term 1 चे निकाल जाहीर केले आहेत. CBSE (Central Board of Secondary Education) बोर्डाच्या शाळांकडे निकाल सोपवण्यात आले आहेत. निकाल आल्याचं जाहीर झालेलं असलं तरी विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप मार्कशीट पडलेली नाही. फक्त किती गुण मिळाले तो आकडा जाहीर झालेला आहे. CBSE ने या वेळी दहावीची परीक्षा दोन सत्रांत घ्यायचा निर्णय घेतला होता. त्यातल्या पहिल्या सत्राचा (CBSE class 10th term 1 results out) हा निकाल आहे. काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 100 टक्के गुण मिळाले आहेत. आणि एकदी विद्यार्थी नापास झालेला नाही.

CBSE बोर्डाने निकाल शाळांकडे सोपवले असल्याची माहिती दिली आहे. आता शाळा आपापल्या पातळीवर गुणपडताळणी करून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटप करतील किंव ऑनलाइन जाहीर करतील. देशभऱातल्या काही शाळांनी गुणपत्रिका द्यायला सुरुवातही केली आहे.

Loading