…तर उद्यापासून बंद होईल तुमचं Netflix, Hotstar आणि Amazon Prime, पेमेंटसाठी RBI च्या नव्या गाइडलाइन्स
मुंबई (प्रतिनिधी): Netflix, Amazon Prime, Disney+ Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्म्स किंवा DTH सर्विसचा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
OTT प्लॅटफॉर्म्स किंवा DTH सर्विससाठी पेमेंट करण्याच्या पद्धतीत आता बदल होणार आहे. पेमेंटसाठी RBI चे नवे नियम 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होणार आहेत.
हे नियम न पाळल्यास तुमचे OTT प्लॅटफॉर्म्स बंद होऊ शकतात. RBI ने Additional Factor Authentication (AFA) साठी नव्या गाइडलाइन्स जारी केल्या असून 1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम बदलणार आहे.
अनेक युजर्स Netflix, Amazon Prime, Disney+ Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्म्सचा किंवा DTH रिचार्ज करण्यासाठी ऑटो पेमेंट सर्विस क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI पेमेंटचा वापर करतात. पण आता 1 ऑक्टोबरपासून RBI आदेशानुसार ऑटो पेमेंट सर्विस बंद केली जाणार आहे. RBI ने पेमेंटसाठी एक अतिरिक्त Additional Factor Authentication प्रोसेस जोडली आहे.
देशात वाढते फसवणुकीचे प्रकार पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिजीटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने Additional Factor Authentication लागू करण्याचे आदेश दिले आहेत. RBI नियमांनुसार, बँकांना पेमेंटच्या तारखेच्या 5 दिवस आधी एक नोटिफिकेशन पाठवावं लागेल. ज्यावेळी ग्राहक यासाठी मंजूरी देईल, त्याचवेळी पेमेंट केलं जाईल. जर रिकरिंग पेमेंट 5000 रुपयांपेक्षा अधिक असेल, तर बँकांकडून ग्राहकांना OTP पाठवावा लागेल. ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेतो हे पाऊल उचललं गेलं आहे.
ग्राहकांचं हित आणि सुरक्षा लक्षात घेता, RBI ने AFA चा वापर करुन एक फ्रेमवर्क तयार करण्याचे आदेश दिले होते. ही प्रोसेस लागू करण्याची तारीख 31 मार्च ठरवण्यात आली होती. मात्र आता ही डेडलाइन 30 सप्टेंबरपर्यंत असणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे उद्यापासून हे नवे नियम लागू होतील.