…तरीही मंदिरं बंद का? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

अरविंद दुबे, महाराष्ट्र एक्स्प्रेस ग्रुप, मुंबई
केंद्र सरकारने अनलॉक 2 ची घोषणा करत राज्य सरकारांना आदेश जारी केले आहे. यात राज्यात सर्वच गोष्टी सुरू होत आहे. परंतु, मंदिर उघडण्यास अजूनही राज्य सरकारने हिरवा कंदील दिला नाही. त्यामुळे  त्र्यंबकेश्वरमधील पुरोहित  मुंबईत कुष्णंकुज बंगल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. महाराष्ट्रातील देवस्थानं लवकर सुरू करावीत अशी मागणी या पुरोहितांनी राज ठाकरेंकडे केली. जवळपास 15 मिनिटं पुरोहित आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली.

महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यात अजूनही लॉकडाउन कायम आहे. परंतु, अनलॉक-2 जाहीर करत राज्यातील उद्योग धंदे आणि सार्वजनिक ठिकाणं अटी शर्थींसह उघडण्यात आली आहे. पण, मॉल जर उघडण्यात आले असेल तर मंदिरं का उघडण्यात आली नाही? असा सवाल थेट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितीत केला आहे.

‘जर मॉल सुरू होत असेल तर मंदिर का सुरू होत नाही?’ असा सवाल राज यांनी उपस्थितीत केला. त्याचबरोबर, ‘जर का मंदिरं उघडली तर भाविकांच्या सुरक्षेचं काय? तुम्ही तुमची काळजी घ्याल पण भाविकांचं काय?’ असा सवाल राज यांनी उपस्थितीत केला.

तसंच, सध्या अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. बाहेर परिस्थितीत बेताची आहे. हा प्रश्नं फक्त एकट्या मंदिरांचा नाही आहे. मशीद, चर्च सुरू झाले आणि रस्त्यांवर गर्दी आली तर काय करावे लागणार असे अनेक प्रश्न आहे, असं राज यांनी सांगितलं.

“मला दोन दिवस द्या, मंदिरं सुरू करण्याबद्दल काही करता येईल का विचार करू”, असं आश्वासनही राज ठाकरे यांनी पुरोहित यांना दिले. दरम्यान, सगळी शहरं आता अनलॉक होण्याच्या मार्गावर आहे. पण संपूर्ण लॉकडाऊन कधी हटवण्यात येणार हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. पण राज्यात कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटवण्यात येणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Loading