जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन JioPhone Next कधी लाँच होणार? सुंदर पिचाई यांनी सांगितलं..
JioPhone Next च्या लॉन्चिंग आधीच या फोनची मोठी चर्चा आहे.
आता याविषयी गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी मोठा खुलासा केला आहे.
आम्ही रिलायंस कंपनीसोबत मेड फॉर इंडिया अफोर्डेबल स्मार्टफोन तयार करत असून यात इतर कोणत्याही स्मार्टफोनसारखे फीचर्स मिळतील.
या फोनला आम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर किंवा दिवाळीच्या एक-दोन दिवस आधी लॉन्च करणार असल्याची माहिती CEO सुंदर पिचाई यांनी दिली आहे.
एका कार्यक्रमात पिचाई यांनी याबाबत हा खुलासा केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं, की भारतात कोरोनामुळे मोबाइल मार्केटवर मोठा परिणाम झाला होता. परंतु आता स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा वेळी स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांना जियोफोन नेक्स्ट मोबाइल फायदेशीर ठरणार आहे. यावेळी त्यांनी या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगबाबतही खुलासा केला आहे.
दरम्यान, Jio ने काही दिवसांपूर्वी JioPhone Next च्या मेकिंगचा व्हिडीओ जारी केला होता. हा स्मार्टफोन प्रगति ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. प्रगती ऑपरेटिंग सिस्टमला गूगल आणि जिओने मिळून तयार केलेलं आहे. यामुळे कमीत कमी किंमतीत ग्राहकांना चांगला एक्सपिरीयंस मिळणार आहे.