ऑनलाईन गेममुळे नुकसान; 13 वर्षीय मुलाची आत्महत्या, सुसाईट नोट वाचून पाणावतील डोळे

मुलांना अभ्यासाठी मोबाईल देताय.. पण लक्ष ठेवा ते नक्की काय करताय…

नवी दिल्ली: खरं तर ही घटना महाराष्ट्रातली नसली तरीही प्रत्येक पालकाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे सध्या प्रत्येकच मुलाच्या हातात मोबाईल आहे. मात्र याचा वापर शिक्षणासाठीच होतोय का की इतर गोष्टींसाठी ह्याकडे पालकांनी वेळोवेळी लक्ष देणं गरजेचं आहे.

ऑनलाईन गेममध्ये पैसे खर्च करत असल्यानं एक आई आपल्या 13 वर्षाच्या मुलाला ओरडली. यानंतर मुलानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आली आहे. यात फ्री फायर खेळताना 40 हजार रुपये हारल्याचं त्यानं म्हटलं आहे. सोबतच या मुलानं आपल्या आईची माफी मागत, आईला न रडण्याचा सल्ला दिला आहे. हे प्रकरण मध्य प्रदेशच्या छतरपुर जिल्ह्यातील आहे.

सागर रोडवर विवेक पांडे आपली पत्नी प्रिती पांडे, मुलगा कृष्णा आणि मुलगी यांच्यासोबत राहात होते. विवेक पॅथोलॉजी ऑपरेटर आहे, तर प्रिती जिल्हा रुग्णालयात आहेत. कृष्णा सहावीचा विद्यार्थी होता. शुक्रवारी दुपारी 3 वाजता वडील पॅथोलॉजीवर होते, तर प्रिती या हॉस्पिटलमध्ये होत्या. इतक्यात प्रिती यांना खात्यावरून 1500 रुपये कट झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला. आईने घरी असलेल्या आपल्या मुलाला फोन केला आणि पैसे का काढले याचं कारण विचारलं. मुलाने सांगितलं, की हे पैसे ऑनलाईन गेममुळे कट झाले आहेत. यानंतर आईनं नाराजी व्यक्त करत त्याला खडसावलं.

यानंतर कृष्णा आपल्या रुममध्ये गेला. त्यानं दरवाजा आतून बंद केला. घरात असलेल्या त्याच्या मोठ्या बहिणीनं काही वेळ दरवाजा वाजवला, मात्र आतून काहीच उत्तर मिळालं नाही. मुलीनं याबाबत आपल्या वडिलांना माहिती दिली. आई-वडील लगेचच घरी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा तोडला असता कृष्णानं गळफास घेतल्याचं त्यांना दिसलं.

मागील काही दिवसांपासून कृष्णा ऑनलाईन गेम फ्री फायर सतत खेळत होता. याआधी त्यानं अनेकदा पैसे हारले होते. मृत्यूनंतर कृष्णाच्या जवळ एक सुसाईट नोट आढळली. ही सुसाईड नोट इंग्रजीमध्ये लिहिली गेली होती. त्यानं यात फ्री फायर गेममध्ये आपण 40 हजार रुपये हरल्याचा खुलासा केला होता. यासोबतच त्यानं आपल्या आई-वडिलांची माफी मागितली होती.
१ ऑगस्ट पासून ATM मधून पैसे काढणं होणार महाग.. RBI चे नवीन नियम लागू

boat

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.