आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता, वाचा कोणत्या भागात काय स्थिती?

नाशिक (प्रतिनिधी): आज आणि उद्या (30, 31 मार्च) दोन दिवस राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याबाबतची माहिती जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलीय.

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी उन्हाचा कडाका तर ढगाळ वातावरण होत आहे. दरम्यान, आज आणि उद्या (30, 31 मार्च) दोन दिवस राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे  यांनी दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी अति भीती बाळगण्याचं कारण नाही. मात्र, सावधानता बाळगावी असं आवाहन खुळे यांनी केलं आहे.

मुंबईसह कोकणातील चार जिल्हे, विदर्भातील बुलढाणा ते गोंदिया, वाशिम ते गडचिरोली अशा 11 जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, कोल्हापूर सांगली आणि सोलापूरपर्यंत अशा 11 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यताही माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात स्वच्छ कोरडे वातावरण असण्याची शक्यता:
दरम्यान, 31 मार्चनंतर विदर्भात दोन दिवस म्हणजे 2 एप्रिलपर्यंत वातावरणाची तीव्रता जाणवू शकते. दरम्यान, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात स्वच्छ कोरडे वातावरण असण्याची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. आजपासून (30 मार्च) महाराष्ट्रात वाढलेल्या तापामानत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

उत्तर भारतातही पावसाची शक्यता, पर्यटकांनी काळजी घ्यावी:
दरम्यान, वैष्णोदेवी, काश्मीर व्हॅली, बद्रीनाथ केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, सिमला कुलू मनाली, देहाराडून थेट अमृतसर तसेच सभोवतालच्या परिसरात आजपासून पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यावी असं आवाहन खुळे यांनी केलं.

Loading